25/06/26
Breaking News

चिराग शहा तलावामुळे हिंगोलीचा पाणीप्रश्न सुटणार : युवा नेते शिवाजीराव मुटकुळे

हिंगोली,दि 16 ः
हिंगोली शहरातील महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या चिराग शहा तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांची युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हिंगोली जिल्हा वार्षिक निधीतून सुमारे 14 कोटी रुपयांच्या खर्चातून सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी बोलताना शिवाजीराव मुटकुळे म्हणाले की, “चिराग शहा तलाव हा हिंगोली शहराचा आत्मा आहे. आमच्या पिढीने दुष्काळ पाहिला, मात्र पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही. या तलावामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून शहरातील बोअरवेलनाही पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे.”
तलावाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील एका महिन्यात काम पूर्णत्वाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे 98 एकर परिसर असलेल्या या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होणार असून परिसरातील शेतकरी व नागरिकांनाही त्याचा थेट फायदा मिळणार आहे.
तसेच या विकासकामाचे ठेकेदार आसाराम घुगे हे अतिशय दर्जेदार पद्धतीने काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हिंगोली शहरासाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक, कार्यकर्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …