हिंगोली,ता 28 –
हिंगोली तालुक्यातील दाटेगाव डिग्रस कऱ्हाळे राहुरी बुद्रुक राहुरी खुर्द संतुक पिंपरी या परिसरामध्ये टाटा पावर या कंपनीमार्फत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाखाली बाराशे एकरवर झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीचे तात्काळ चौकशी करण्याची मागणी सुनील माने या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी करोड रुपये निधी देत असते.
पण टाटा पावर या सौर ऊर्जा प्रकल्पाकडून बाराशे एकर वर असलेल्या वृक्षतोडीची शासनाने व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून ज्यांनी वृक्षतोड केली त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सुनील माने यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तहसीलदार वनविभाग वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा केले आहे.
शेतकऱ्यांनी एखाद्या बांधावरचे जर एक झाड तोडले तर वनाधिकारी व पोलिसाकडून कार्यवाही होते पण बाराशे एकर वर असलेले वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई का होत नाही याबद्दल सुनील माने यांचे यांनी वृक्षतोडक करणाऱ्यावर कारवाई का होत नाही याबद्दल शेतकरी वर्गातून फार मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
दरवर्षी या परिसरात तापमान कमी असतं पण यावरती झालेल्या वृक्षतोडीमुळे अत्यंत तापमानामध्ये वाढ झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंबे चिंच जांभळून मोहन इत्यादी प्रकारचे अत्यंत उपयुक्त असे वृक्ष होते पण हे वृक्ष तोडून सुद्धा वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई का होत नाही हा प्रश्न समोर येत आहे. एवढे उपयुक्त वृक्ष तोडून सुद्धा शेतकऱ्यांना त्या वृक्षतोड केलेल्या वृक्षांचा मोबदला सुद्धा मिळाला नाही याबद्दल शेतकरी वर्गामध्ये फार मोठी खंत व्यक्त होत आहे.सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली झालेल्या वृक्षतोडीची सखोल चौकशी न झाल्यास सुनील माने यांच्याकडून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Shabdraj www.shabdraj.com