‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’ ‘Don’t just suspend him—throw him straight into jail!’
मुंबई – मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ चर्चेत असतानाच आता दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका साध्या वेशातील पोलीस अधिकाऱ्याने महिला आंदोलकाशी अयोग्य वर्तन केल्याचा दावा करण्यात येत असून, या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर टॅग करत संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नेमकं व्हिडिओमध्ये काय दिसतं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला आंदोलक घोषणाबाजी करत असताना, फुटपाथलगत असलेल्या विजेच्या पेटीमागून एक साध्या वेशातील पुरुष अचानक पुढे येतो. तो एका आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, या गोंधळात संबंधित अधिकाऱ्याचा महिला आंदोलकाशी अयोग्य पद्धतीने संपर्क झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, “ही पोलिसांची कारवाईची पद्धत आहे का?” असा संतप्त सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. या व्हिडिओची सत्यता किंवा संपूर्ण घटनाक्रमाबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम?
याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा.. आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा.
एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला… pic.twitter.com/LsvEhwALzT— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 23, 2026
रोहित पवारांचा संताप; “निलंबन नव्हे, थेट बडतर्फ करा”
या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले,
“हा व्हिडिओ पाहून डोक्याची तिडीक उठली. हा कोण नराधम आहे? आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत इतकं किळसवाणं वर्तन करणाऱ्याला कोणतीही माफी नाही. हा पोलीस अधिकारी असेल, तर त्याला केवळ निलंबित करू नका, थेट पोलीस दलातून बडतर्फ करा. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला लागलेली ही कीड आहे.”
रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अधिकृत भूमिका अद्याप नाही
या व्हायरल व्हिडिओबाबत मुंबई पोलीस किंवा राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
Shabdraj www.shabdraj.com