28/11/26
Breaking News

सुनेगावात गोमातेचा डोहाळे जेवण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

गंगाखेड (प्रतिनिधी रामप्रसाद ओझा) : गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव येथे शुक्रवार रोजी श्रीहरी सूर्यवंशी यांच्या मळ्यात गोमातेच्या डोहाळे जेवणाचा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प.पू. श्री श्री १००८ महंत पद्मनाभानंद गिरी यांचे प्रवचन झाले. आपल्या प्रवचनातून त्यांनी गाय ही केवळ पशू नसून भारतीय संस्कृतीत तिला मातेचे स्थान आहे, असे सांगितले. गोसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून गोमातेचे महत्त्व, गोसेवा आणि गोसंवर्धन याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्मिक मार्गदर्शन केले.
या सोहळ्यानिमित्त गोमातेचे पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवण करण्यात आले. गाईला हळद-कुंकू लावून, फुलांची माळ घालून विधिवत पूजन करण्यात आले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमानंतर उपस्थित ग्रामस्थ, महिला व नातेवाईकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याचे आयोजन श्रीहरी शिवाजी सूर्यवंशी व जनार्दन शिवाजी सूर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले होते. या धार्मिक उपक्रमाला ग्रामस्थ व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Check Also

औंढा तालुक्यात सहा परीक्षा केंद्रावर १३५० विद्यार्थ्यांनी दिली नवोदयची परीक्षा.

औंढा नागनाथ (प्रतिनिधी ) औंढा तालुक्यात सहा परीक्षा केंद्रावर दिनांक २८ नोव्हेंबर रोजी नवोदय ची …