भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. यासाठी रविंद्र चव्हाण यांनी आपला अर्ज केंद्रीय निरीक्षक किरेन रिजुजी यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. 1 जुलै रोजी संध्याकाळी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा …
Read More »Shabdraj
जमिनीचे हे कागदपत्रे असणे बंधनकारक, अन्यथा शासन घेणार…..
मुंबई : शेतकऱ्यांकडे त्यांच्या शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रांचा अभाव असल्यास, कायद्यानुसार अशा जमिनीवर सरकार ताबा घेऊ शकते. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये महसूल विभागाकडून वेळोवेळी भूमापन आणि सर्वेक्षण केले जाते. त्यावेळी मालकीचे दस्तऐवज न सादर झाल्यास शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवरील हक्क सिद्ध करण्यात अडचणी येऊ शकतात. कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? राज्य महसूल नियमावलीनुसार कोणतीही जमीन ‘रिक्त’ किंवा ‘अनधिकृत’ असल्याचे सिद्ध झाल्यास ती शासनाच्या मालकीची समजली …
Read More »प्रतिक्षा संपली…अकरावीच्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेल्या 11 वी प्रवेशाची (XI admission) यादी दोन दिवसांआधीच जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे 11 वी प्रवेशाची पहिली यादी 30 जूनला जाहीर होणार होती, पण पहिली गुणवत्ता यादी आजच शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. जवळपास मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते. राज्यातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावीत कॉलेजसाठी (College) ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी …
Read More »विदयार्थी जर सुसंस्कारित असेल तर भविष्यात त्याला काहीच अडचण येणार नाही-सागर सुभेदार
सेलू ( नारायण पाटील ) येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दि २८/६/२५ रोजी संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड अनिरुद्ध जोशी होते .तर प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ बडोदा शाखा विरार चे शाखाव्यवस्थापक तसेच याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर सुभेदार यांची उपस्थिती होती . संस्थेचे सचिव प्रसिद्ध उद्योजक महेशराव खारकर …
Read More »डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे जी पॅट परीक्षेत यश
पाथरी / प्रतिनिधी – अखिल भारतीय स्तरावरील जी पॅट परीक्षेत डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी पात्र झाले आहेत.कुमार.ज्ञानेश्वर नामदेव मगर व कुमारी.शारदा शिवाजी वाव्हळे यांनी चांगल्या गुणांनी परीक्षेत यश संपादित केले व महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यार्थ्याच्या यशासाठी परभणी मतदार संघाचे आमदार डॉ.राहुलजी पाटील , श्री. परिहार साहेब व रमेश पाटील सर,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले सर …
Read More »शेतकऱ्यांसाठी शून्य ऊर्जेवरील शीतकक्ष प्रात्यक्षिक
सेलूतील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा उपक्रम सेलू / प्रतिनिधी – येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी वालूर येथे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष तयार करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या दाखवले. हा नाविन्यपूर्ण शीतकक्ष भाजीपाला आणि फळांच्या योग्य साठवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. वालूर येथे पार पडलेल्या या प्रात्यक्षिकादरम्यान, कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना विटा, वाळू, बांबू आणि वाळलेल्या गवताचा वापर करून अत्यंत कमी खर्चात शीतकक्ष कसा …
Read More »पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’
परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे एबीपी माझा वृत्तवाहिनीचे परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीची ही राज्यस्तरीय पातळीवरील दखल ठरली आहे. ५१ हजार रुपये रोख आणि राज्य शासनाचे प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पंकज …
Read More »ध्येय निश्चित करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा-तहसीलदार डॉ. शिवाजी मगर
सेलू (नारायण पाटील ) जीवनात अशक्य असे काहीच नाही.समाजात जीवन जगत असतांना फक्त आपण स्वतः स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे.आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी ध्येय निश्चित करून ते यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम करा असे मत तहसीलदार डॉ शिवाजी मगर यांनी केले. येथील श्री के.बा.विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्यावतीने आयोजित “हात मदतीचा “या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना तहसीलदार मगर म्हणाले की,छत्रपती …
Read More »टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन
परभणी – परभणी जिल्हा टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएनच्या वतीने दि. 28 जून 2025 रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्हा टॅक्स प्रॅक्शिनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित चर्चासत्राचे उदघाटन पालकमंत्री ना.मेघनादीदी बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त धनजंय देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या दोन दिवसीय चर्चासत्राला मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून शनिवार दिनांक …
Read More »एच.ए.आर.सी संस्थेकडून गंगाखेडात 40 अनाथ,एकल पालक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप
परभणी,दि 26 ः गंगाखेड तालुक्यातील शिवाजी नगर तांडा, पिंपळदारी, मरडसगाव, कौडगाव, झोला, महातपुरी, सुनेगाव, सुप्पा, दत्तवाडी, दुसलगाव, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड, या जिल्हा परिषद शाळेतील अनाथ व एकल पाल्याची पालकत्व स्वीकारून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्था परभणी तर्फे दि 26 जून रोजी 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले. समाजातील वडिलांचे छत्र हरवलेल्या एकल पालक व …
Read More »