हिंगोली (प्रतिनिधी) परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे आणि त्यांच्या सुनबाई सौ. राजामती शिवाजीराव मुटकुळे यांनी आपले उमेदवारी अर्ज परभाणी येथे दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, सहकाराची समृद्ध परंपरा जपत जिल्ह्यातील शेतकरी, बँक सभासद आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपण …
Read More »Shabdraj
क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसून वाहतूक करू नये,पोलिस अधीक्षकांची सुचना
हिंगोली,ता 18 हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्हॅन आणि ऑटो चालकांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी १८ पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश शाळेत ये-जा करणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे हा होता. चालकांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसून वाहतूक करू नये यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी केल्या. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात विद्यार्थ्यांची वाहतूक …
Read More »वाळू माफियांच्या कृत्यामुळे खड्ड्यांत अडकून १९ वर्षीय युवकाचा बळी
दै./रामप्रसाद ओझा / गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड शहरालगतच्या गोदावरी नदीपात्रात मृत्यूची भीषण मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. वाळू माफियांच्या बेकायदेशीर उत्खननामुळे तयार झालेल्या खोल, जीवघेण्या खड्ड्यांनी पुन्हा एकदा निष्पाप युवकाचा जीव घेतला आहे. शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे (वय १९) हा युवक गुरुवारी (दि. १८ जून) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास नातेवाईकांसोबत नदीपात्रात अंघोळीसाठी गेला असता, पोहताना नदीतील खोल …
Read More »ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर;
सेलू (प्रतिनिधी) वीज ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया राबवू नये तसेच स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील विविध भागांमध्ये पारंपरिक वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. मात्र अनेक ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, बिल आकारणीची …
Read More »शेख दांपत्याने रोवला गंगाखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
दै. प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा, गंगाखेड कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी आणि स्पर्धा परीक्षांचा कठीण प्रवास एकाच वेळी सांभाळत गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील शिक्षक दांपत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि समाजसेवेची तळमळ यांच्या बळावर शेख नजिमा इसाकसाब व शेख इमाम बागन या दांपत्याने अधिकारीपदापर्यंत मजल मारत अनेकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. मूळ पालम तालुक्यातील मोजमाबाद येथील अत्यंत …
Read More »परभणीत शिवसैनिक पेटले! खासदार संजय जाधवांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा!
सोनपेठ,दि 18 (प्रतिनिधी)ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर निष्ठावान शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. सोनपेठमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक होत खासदार संजय जाधव यांच्याविरोधात तीव्र जोडेमार आंदोलन केले आहे. सोनपेठ येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच शिवसैनिक प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट खासदार संजय जाधव यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घातला आणि तिथूनच …
Read More »ऑपरेशन टायगरचा दुसरा अंक? ठाकरे गटातील खासदारांबाबत दिल्लीत मोठ्या घडामोडी
दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन स्वतंत्र गटाची भूमिका स्पष्ट करणार …
Read More »नागपूर हादरले! प्लॉटच्या आमिषातून सुरू झालेल्या प्रकरणाचा धक्कादायक शेवट
नागपूर – नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय वायुसेना (IAF) अधिकाऱ्याच्या पत्नीला जाळ्यात ओढून तिचे शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे याने प्लॉट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने पीडित महिलेशी संपर्क साधला. …
Read More »भद्राचलममध्ये 6 दिवसांपासून मान्सून अडकला….
देशातील 9 राज्यांमध्ये प्री-मॉन्सून सक्रिय झाला आहे. पण अनेक भागांतील तापमान अद्याप तसेच आहे. तेलंगणातील भद्राचलममध्ये 6 दिवसांपासून मान्सून अडकला आहे. तो पुढे सरकल्याशिवाय या बाजूने मध्य प्रदेशला धडकणार नाही. दुसरीकडे अरबी समुद्रापलीकडे मान्सूनचा विस्तार झालेला नाही. तो 8 जूनपासून येथे अडकला आहे. जागतिक मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशनच्या हायड्रोमेट्री टीमचे सदस्य डॉ. पंकज कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशात मान्सूनचा प्रवेश पुढील 5 …
Read More »पान टपरी चालकांमध्ये प्रचंड घबराट,पान टपऱ्या पटापट बंद
प्रशासकीय वर्तुळात आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कारभारासाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासन (आयुक्त तुकाराम मुंढे आज नांदेड दौऱ्यावर आल्याची एकच अफवा शहरात पसरली. या एकाच अफवेने शहरातील पान टपरी चालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि कारवाईच्या भीतीपोटी दुपारनंतर शहरातील मुख्य भागातील पान टपऱ्या पटापट बंद झाल्या. अनेक टपरी चालक तर टपऱ्या कुलूपबंद करून थेट पसार झाले. तुकाराम मुंढे यांनी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com