07/11/26
Breaking News

Shabdraj

पाणी वापराच्या काटकसरीबाबत गावागावात जनजागृती करा – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोली, दिनांक 17  : अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली आहे. संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी कालावधीत संभाव्य पाणी, चारा टंचाईच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करा. प्रत्येक गावागावात पाणी वापराच्या काटकसरीबाबत व्यापकप्रमाणात जनजागृती करा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनास केल्या. …

Read More »

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८७५ शाळांमध्ये पुस्तकदान उपक्रम

हिंगोली, दि. १७ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व ८७५ शाळांमध्ये पुस्तकदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शाळांमधील ग्रंथालये समृद्ध करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत राहुरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक …

Read More »

शारदा विद्यामंदिरच्या खेळाडुंची जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी!

कळमनुरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, हिंगोली येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कळमनुरी येथील शारदा प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर, शास्त्रीनगर येथील १४ वर्षांखालील मुलांच्या सेपकटकरा (Sepaktakraw) संघाने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांचे संघ सहभागी झाले होते. अटीतटीच्या सामन्यांमध्ये शारदा विद्यामंदिरच्या खेळाडूंनी …

Read More »

लवकरच पीएम किसान निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता

सर्व शेतकरी पीएम किसान निधी त्यांच्या खात्यात कधी जमा होईल याची वाट पाहत आहेत. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांमुळे, या महिन्यात कोणत्याही क्षणी पैशांचा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. २३ वा हप्ता वितरित होऊन चार महिने झाले, केंद्र सरकार आता पुढील हप्ता वितरित करण्याची तयारी करत असल्याचे समजते. मात्र निधी …

Read More »

गंगाखेडात कारच्या धडकेत ऑटोचालकाचा मृत्यू

रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड शहरातील भगवती मंदिर कॉर्नर परिसरात मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) रात्री कार आणि ऑटो यांच्यात झालेल्या अपघातात ऑटोचालक लखन नामदेवराव वायसे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती आहे. तक्रारीतील माहितीनुसार, रोशन मोहल्ला येथील रहिवासी लखन वायसे हे ऑटो क्रमांक एमएच २२ एफ २३४८ ने रात्री सुमारे १०.१० वाजता घरी जात होते. …

Read More »

उत्सव २०२६ दांडिया महोत्सवाचा आजपासून जल्लोषात शुभारंभ!

हिंगोली : उत्सव फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘उत्सव २०२६ डांडिया महोत्सवा’चा आज, बुधवार दि. १४ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शुभारंभ होत आहे. दि. १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या या पाच दिवसीय महोत्सवात डांडिया नृत्य, आकर्षक वेशभूषा, विविध विशेष पुरस्कार आणि पारंपरिक संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘ऑरेंज ट्रेडिशन’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून, महिला सदस्य भगव्या …

Read More »

अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी

राज्यातील दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ सुविधा लागू करण्यात आली आहे. दस्त नोंदणीतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी हा नवा निर्णय जाहीर केला आहे. अर्जासोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांची आता तब्बल सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर क्रॉस चेकिंग केली जाणार आहे. दस्त नोंदणीचा …

Read More »

गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षा

रामप्रसाद ओझा गंगाखेड,दि 14 गंगाखेड तालुक्यात पीक कापणी प्रयोग आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाचा सध्याचा वेग पाहता यंदा अहवाल वेळेत तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडले असून, नुकसानभरपाई मिळण्याच्या प्रक्रियेत विलंब झाल्यास त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग, पंचनामे …

Read More »

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 हजार रुपयांचा अग्रिम

राज्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने बळीराजाला मोठा दिलासा देणारे चार महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. पूर्वी जाहीर केलेल्या 265 तालुक्यांमध्ये आणखी 40 तालुक्यांची भर घालत आता राज्यातील तब्बल 305 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत दुष्काळी मदतीची कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष निधी येण्यास डिसेंबर उजाडतो; परंतु यंदा …

Read More »

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, वेळ आणि इतर माहिती लवकरच मिळणार आहे. जोपर्यंत अंतिम वेळापत्रक जाहीर होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या गेल्या वेळच्या वेळापत्रक आणि सँपल प्रश्न पत्रिकांचा वापर 2026-27 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी करता येणार आहे. केंद्रिय बोर्ड 2027 परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षांचे …

Read More »