07/11/26
Breaking News

Shabdraj

श्री शिवाजी तंत्रनिकेतन मधील दोन विद्यार्थ्यांची इस्रो केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड

परभणी,दि 17 ः परभणी येथील म. शी.प्र मंडळ संचलित श्री शिवाजी तंत्रनिकेतन मधील संगणक विभागाचे दोन विद्यार्थी देवश्री आनंद पाथरीकर व रघुराज सातोणकर यांची इस्रो केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. सदरील स्पर्धा ही पुणे येथील ए एस एम (ASM) ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये रविवार दिनांक 11/10/ 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन तर्फे” …

Read More »

 फरार आरोपीला औंढा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औंढा नागनाथ,दि 17 (प्रतिनिधी)ः औंढा नागनाथ पोलीस स्टेशन औंढा येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या पुण्यातील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथे गुन्हा दाखल असलेल्या आरोपी रवी उर्फ साहेबराव मोतीराम टोम्पे राहणार शेळगाव गौरी तालुका नायगाव जिल्हा नांदेड हा गेल्या दोन वर्षापासून फरार होता सदर फरार आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यासाठी पोलीस …

Read More »

हिंगोलीत दसरा महोत्सव स्पर्धेत महसूल क्रिकेट संघ विजयी

हिंगोली,दि 17 संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आज सकाळी महसूल क्रिकेट संघ विरुद्ध पत्रकार क्रिकेट संघ यांच्यात रंगतदार सामना खेळविण्यात आला. या सामन्यात महसूल क्रिकेट संघाने पत्रकार क्रिकेट संघावर मात करत विजय संपादन केला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्र्याकडून सेलू तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

सेलू ( प्रतिनिधी ) केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना.श्री रामदासजी आठवले यांनी सेलू तालुक्यातील दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी हातनूर व वालूर परिसरातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान परिसरातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतीसमोरील समस्यांची माहिती घेण्यात आली. दुष्काळामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.या दौऱ्यामुळे परिसरातील दुष्काळग्रस्त नागरिकांच्या समस्या केंद्रीय …

Read More »

आरक्षण उपवर्गीकरण मोर्चाच्या तयारीसाठी सेनगावात मातंग समाजाची बैठक

सेनगाव प्रतिनिधी मोहन कांबळे  मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी १३ नोव्हेंबर रोजी सेनगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीच्या अनुषंगाने मातंग समाज बांधव आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक सेनगाव येथे पार पडली. या बैठकीत आगामी मोर्चाचे नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि समाजाची भूमिका यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजाची भूमिका मांडण्यासाठी तसेच मोर्चाच्या माध्यमातून आपल्या …

Read More »

अपक्ष उमेदवार रुपेश उंबरकर यांचा विद्यार्थ्यांचे प्रश्न, रोजगार आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी लढण्याचा संकल्प

पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार उंबरकर रुपेश शिवाजी (उमेदवार क्रमांक २२) यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न, सुशिक्षित तरुणांचा रोजगार, शिक्षकांच्या समस्या आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत ठामपणे आवाज उठवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. मोठ्या राजकीय घराण्याची पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातून आलेल्या रुपेश उंबरकर यांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, नोकरीच्या शोधात असलेल्या …

Read More »

सेलूत रासायनिक प्रक्रियेने पिकविलेल्या केळींच्या विक्रीची तपासणी करा!

सेलू | प्रतिनिधी सेलू शहरात रासायनिक प्रक्रियेने पिकविलेल्या केळींच्या विक्रीबाबत सखोल तपासणी करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी जिल्हाधिकारी, परभणी तसेच सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. केळी हे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडून मोठ्या प्रमाणात सेवन …

Read More »

गॅस सिलिंडरसाठी ११०० रुपये घेतल्याचा आरोप; ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार!

हिंगोली,दि 17 शेतकरी आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडले असताना, आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दराबाबतही ग्राहकांकडून तक्रारी समोर येत आहेत. भारत गॅसच्या अंबरवाडी येथील वितरण गाडीवरून गॅस सिलिंडर घेताना ११०० रुपये आकारण्यात आल्याचा आरोप ग्राहक ज्योती मोहन कांबळे यांनी केला आहे. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास भारत गॅसची अंबरवाडी येथील वितरण …

Read More »

शेतमाल खरेदी करून ४६ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

जिंतूर, प्रतिनिधी : शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हरभरा, तूर, हळद आणि भुईमूग यांसह विविध शेतमाल खरेदी करून त्याचे पैसे न देता तब्बल ४६ लाख ४२ हजार ९२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जिंतूर तालुक्यातील केहाळ रामनगर तांडा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनिल बंडे, श्रीराम बंडे आणि नागेश बंडे या तिघांविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात १५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या …

Read More »

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विद्यार्थ्यांशी संवाद; १६० पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे दान

हिंगोली, दि. १७  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात आणि शाळांमधील ग्रंथालये समृद्ध व्हावीत, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत गणेशवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुस्तकदान शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमातून लोकसहभागाची प्रभावी जोड देत शाळेला १६० पुस्तके आणि विविध शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या उपक्रमाला …

Read More »