24/06/26
Breaking News

Shabdraj

 हिंगोलीत सईद खान यांच्या विजयाचा जल्लोष; गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी!

हिंगोली,दि 22 ः परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सईद खान यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या दणदणीत विजयाची घोषणा होताच हिंगोली जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हिंगोली शहरातील ऐतिहासिक आणि मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गांधी चौक येथे महायुतीच्या वतीने भव्य जल्लोष करण्यात आला. शिवाजी मुटकुळे (अध्यक्ष, भाजप जिल्हा युवा …

Read More »

सीए अनूप शुक्ला यांची महाराष्ट्र चेंबरच्या परभणी जिल्हा गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध निवड

गंगाखेड / प्रतिनिधी – परभणी येथील रहिवासी सीए अनूप शुक्ला यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर, मुंबईच्या परभणी जिल्हा गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांची ही निवड जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे. सीए अनूप शुक्ला यांची निवड त्यांच्या व्यावसायिक अनुभव, आर्थिक क्षेत्रातील जाण, कार्यकुशलता …

Read More »

ऑपरेशन टायगर संकटात:’शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही’, ओमराजेंच्या यू टर्नने, त्या पाच जणांची खासदारकी धोक्यात

‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर आणि 5 जणांची खासदारकी संकटात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे  …

Read More »

एचएआरसीच्या वतीने सेलू तालुक्यातील ४५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण

सेलू ( प्रतिनिधी ) होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी यांच्या शैक्षणिक पालकत्व उपक्रम २०२६ अंतर्गत सेलू तालुक्यातील ४५ एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, सेलू येथे शनिवार ता. २० रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. सचिन मंत्री हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण गाडेकर व …

Read More »

यशवाडी मंदिराचा गाभारा कोसळला,बचावकार्य सुरु 

यशवाडी मंदिराचा गाभारा कोसळला,बचावकार्य सुरु परभणी,दि 20 परभणी ते मानवत या रस्त्यावरील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील मंदिराचा गाभारा कोसळून काही भाविक दबले आहेत.बचाव कार्य सुरु झाले आहे. या मंदिराच्या गाभार्‍याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. या गाभार्‍याच्या बांधकामात दगडांचा वापर होत होता. आज शनिवार रोजी या मंदिरात भाविकांची दर्शनाकरीता मोठी गर्दी उसळली. त्यावेळी गाभार्‍याचा काहीसा भाग विशेषतः दगड कोसळून काही …

Read More »

पानकन्हेरगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

सेनगाव,दि 20 (प्रतिनिधी) सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी धाड टाकून कारवाई केली. अनिल जाधव यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली काही जण विनापरवाना ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत 4 हजार 400 रुपये रोख रक्कम, तीन मोटारसायकली, तीन मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 78 …

Read More »

सकारात्मक विचारच आनंदी जीवनाचे शिल्पकार -पद्मनाभ महाराज व्यास

सेलू ( प्रतिनिधी ) आपण डोळ्यांनी जे पाहातो त्याचा मनावर अधिक प्रभाव पडतो म्हणून चांगले तेच पाहिले पाहिजे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन त्याचे विचार कसे आहेत यावरून होते. आपला स्वभाव चांगला होण्यासाठी नेहमी चांगले चिंतन करावे. सकारात्मक विचारच सुखी जीवनाचे शिल्पकार असतात, असे प्रतिपादन पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले. पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे सातवे …

Read More »

सहकारातील रणशिंग फुंकले! आ. डॉ. रत्नाकर गुट्टेंचा थेट प्रवेश

 रामप्रसाद ओझा / गंगाखेड परभणी–हिंगोली जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत २०२६-२०३१ गंगाखेडचे डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी थेट रणांगणात उडी घेतली आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, गंगाखेड मतदारसंघातून संचालक पदासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक अधिकारी सुरेश पी. काकडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी बी. एस. नांदापुरकर यांच्याकडे दाखल केला. या घडामोडीमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, …

Read More »

गंगाखेड रेल्वे स्टेशन परिसरात भीषण आग; घर, संसारोपयोगी साहित्य आणि भंगार गोदाम जळून खाक

गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा – गंगाखेड रेल्वे स्टेशन परिसरात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत राजाभाऊ गुंड यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले असून घरातील संसारोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कम तसेच अवघ्या तीन महिन्यांपूर्वी घेतलेली मोटारसायकलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.   मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारील उकिरड्यावर कचरा जाळण्यात आल्याने ही आग …

Read More »

खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

गंगाखेड, प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ गंगाखेड शहरात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदार संजय जाधव यांनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जनतेच्या मतांवर निवडून येऊन …

Read More »