मुंबई : जर तुमच्याकडं पॅन कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्राप्तिकर विभागानं सर्व पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन आधार कार्डाशी तात्काळ लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर 2025 नंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. अनेक करदात्यांना अजूनही ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. लिंकिंग न केल्यास 1000 रुपयांचा दंड भरावा …
Read More »Shabdraj
तळीरामांसाठी खुशखबर… नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यविक्रीच्या वेळेत शिथिलता
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरची रात्र नेहमीच खास असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मद्यपींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे यंदाचं नववर्ष अधिक दणक्यात साजरं करता येणार आहे. राज्याच्या गृह विभागाने ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. तसेच बार आणि क्लबमध्ये पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यसेवन करता येणार आहे. अन्य दिवशी मात्र …
Read More »पालक-चिकन खाण्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू
आवडीचे चमचमीत पदार्थ ताटात दिसले की आपण त्याच्यावर तुटून पडतो. मात्र ते अतिप्रमाणत खाल्लं की वेगवेगळ्या परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागत. अशीच एक घटना ओडिशात घडली आहे. पालक चिकन खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. विषबाधेमुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील इटप गावात एका कुटुंबाने पालक चिकन खाल्लं. त्यानंतर त्यांना त्रास …
Read More »‘बीएसएनएल’ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी….
जर तुमच्याकडे बीएसएनएल सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बीएसएनएलने अलीकडेच देशभरात 4G सेवा सुरू केल्या आहेत आणि आता 5G आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, बीएसएनएलने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएल 3G सेवा बंद करत असल्याची माहिती समोर येत आहेत. 5Gवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यासाठी तयारी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे. असे मानले …
Read More »नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
नांदेड : जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तर, या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस (Police) प्रशासनही चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी …
Read More »मोहंमद रफी यांच्या जयंती निमित्त सेलूत संगीत मैफिल ” शाम ए सरगम” तर्फे संगीतमय मानाचा मुजरा
सेलू ( प्रतिनिधी ) प्रसिद्ध गायक मोहंमद रफी यांच्या १०१ व्या जयंती निमित्त येथील सेवानिवृत्त संघ सेलू यांच्या वतीने संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते . दि २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सेवानिवृत्त संघाच्या पेन्शन भवन मधील विसावा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माजी अध्यक्ष गोविंदभाऊ जोशी हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून येथील उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक …
Read More »साने गुरुजींचा जीवन प्रवास म्हणजे “श्यामची आई” – मंजुषा बोराडे
सेलू / प्रतिनिधी – “श्यामची आई ” पुस्तक म्हणजे साने गुरुजींचा जीवन प्रवास असून मराठी साहित्यातील मैलाचा दगड असल्याचे विचार सहशिक्षिका मंजुषा बोराडे यांनी एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले . स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने साने गुरुजी यांच्या जयंती निमिताने आयोजित” एक दिवस एक पुस्तक” या उपक्रमात साने गुरुजी लिखित ” श्यामची आई ” या पुस्तकाच्या चर्चा कार्यक्रमाचे …
Read More »मोठी बातमी : क्रिकेटच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड तुटले
बिहार संघाने क्रिकेट इतिहासात नवा सुवर्णअध्याय लिहिला आहे. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात बिहारने 50 षटकांत 6 गडी गमावत तब्बल 574 धावा ठोकल्या. या डावात 3 फलंदाजांनी शतके ठोकली. हा लिस्ट-ए क्रिकेटमधील आजवरचा सर्वोच्च संघ स्कोअर ठरला आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध बिहारच्या फलंदाजांनी खळबळ उडवून दिली. वैभवची वादळी खेळी, तीन वर्षांनंतर तुटलेला विक्रम सलामीवीर वैभव …
Read More »सेलूत माधवाश्रम स्वामी महाराजांचा ७६ वा पुण्यतिथी महोत्सव सुरू
सेलू / प्रतिनिधी – शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरात दि २४ डिसेंबर पासून परम पूज्य माधवाश्रम स्वामी महाराज यांच्या ७६ व्या पुण्यतिथी सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे . आज सकाळी प पू माधवाश्रम स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच स्थापीत देवतेचे व कलश पूजन मंदिर चे पुजारी केशवराव मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बालासाहेब खापरखुंटीकर ,सुधीर मंडलिक यांनी …
Read More »मोंढा येथे मराठा वधु वर परिचय पत्रिकेचे प्रकाशन
परभणी / प्रतिनिधी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या वधु वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन नवामोंढा परभणी येथे पंढरीनाथ घुले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. यावेळी वधु वर परिचय मेळावा ही काळाची गरज असून सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे अहवाल उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सभापती यांनी केले …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com