परभणी, दि. 23 – जायकवाडी, माजलगाव या धरणांमधून परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत होणारा विसर्ग याशिवाय इतर प्रकल्पांतून जिल्ह्यातील विविध नद्यांमध्ये होणारा विसर्ग तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल, पोलीस, सैन्यदल, एसडीआरएफचे पथक ही सर्व यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, विशेषत: नदीकाठच्या गावांतील लोकांनी दक्षता घ्यावी. कुठलेही धाडस करु नका आणि अफवांवर विश्वास ठेवू …
Read More »Shabdraj
शेतकऱ्यांच्या लेकी होणार सॉफ्टवेअर इंजिनिअर,श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
परभणी,दि 22 (प्रतिनिधी)ः श्री शिवाजी महाविद्यालयातील बीसीएस्स संगणक शाखेच्या आठ विद्यार्थ्यांची पुणे येथील किरण या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या अग्रणी खाजगी कंपनीने प्रशिक्षण आणि नोकरीसाठी निवड केली आहे. यात शेतकरी वडील असलेल्या सहा मुलींचा समावेश आहे. या निवडीमुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सदरील कंपनीने महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती आयोजित केल्या होत्या. यात लेखी आणि तोंडी परिक्षांत जे विद्यार्थी …
Read More »त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ला प्रकरणी सेलूत व्हॉईस ऑफ मीडियाने केला निषेध
सेलू,दि 22 (प्रतिनिधी)ः त्र्यंबकेश्वर नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडियाच्या सेलू तालुका संघटनेच्या वतीने निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना सोमवार २२ रोजी निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकणासाठी गेलेल्या पत्रकारांवर २० सप्टेंबर रोजी स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत असलेल्या गुंडांनी झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे …
Read More »शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सेलूतील जगदंबा नवरात्र महोत्सवास प्रारंभ
नारायण पाटील सेलू,दि 22 ः शहरातील शेरे परिवाराचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या शेरे गल्ली मधील जगदंबा नवरात्र महोत्सव दि २२ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात घटस्थापना करून सुरू झाला .यावेळी रमेश विठ्ठलराव शेरे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करण्यात आले . दि २३ सप्टेंबर पासून देविभागवत कथेस प्रारंभ होणार असून भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य वाणीमधून या ग्रँथाचे निरूपण केले …
Read More »जीएसटी दरकपात हा सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग-पालकमंत्री मेघना बोर्डीकर
सेलू ( प्रतिनिधी ) सर्व सामान्य माणसाची जीवनशैली सुखी व संपन्न होण्यासाठी सेवा करांच्या दराची पुनर्रचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटी च्या नव्या कररचनेमुळे सर्वसामान्य माणसांची जीवनशैली निश्चितच सुखी व संपन्न होणार आहे .असा विश्वास राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला . यावेळी बोलतांना त्यांनी स्पष्ट …
Read More »आभाळ फाटणार……पुन्हा आठवडाभर ढगफुटी…
मुंबई, दि 22: 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, आणि 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे. या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान 30 सप्टेंबर पर्यंत तरी राज्यातून मान्सून …
Read More »आर्थिक परिस्थितीवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी
रवळगाव येथील आरती जगन्नाथराव रोडगे, भौतिकशास्त्र विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम सेलू / नारायण पाटील – तालुक्यातील रवळगाव येथील विद्यार्थिनी कु. आरती जगन्नाथराव रोडगे हिने ,अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जात, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम एस सी फिजिक्स म्हणजेच , भौतिकशास्त्र विषयात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली ,असेच …
Read More »सतीश जाधव समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
सेलू / प्रतिनिधी – शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविनारे,ज्यांचे कार्य सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आहे असे सतिश सदाशिव जाधव यांना इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई यांनी सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव यांचा समाजभूषण पुरस्कार 2025 देऊन दि 20 सप्टेंबर शनिवार रोजी विश्वनाथ भावे नाटय़गृह वाशी नवी मुंबई येथे शाल हार पुष्पगुच्छ तसेचे …
Read More »कसली ई-केवायसी..नुसता एरर…मनस्ताप..काय सुरु आहे हे……..
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी सक्तीचे केले असले, तरी ही प्रक्रिया महिलांसाठी मोठा त्रासदायक अनुभव ठरत आहे. दोन महिन्यांची मुदत देऊन शासन निर्णय जारी करण्यात आला असला, तरी लिंक ओपन न होणे, अधिकृत संकेतस्थळावर वारंवार एरर येणे, ओटीपी न मिळणे या तांत्रिक अडचणींनी बहिणींना खूपच मनस्ताप होत आहे. राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारने …
Read More »एसटी महामंडळात 17 हजार 450 पदांची भरती होणार…2 ऑक्टोबर पासून करा…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच 17 हजार 450 चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. येत्या काही काळात एसटी महामंडळ 8 हजार नवीन बस खरेदी करणार आहे. या बससाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळं ही भरती करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात होणाऱ्या भरतीसाठी 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची अलीकडेच बैठक पार पडली. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com