मतदारांची पळापळ तर प्रशासनाची धावपळ सेलू ( नारायण पाटील ) – नुकत्याच होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या नगर परिषदेकडून प्रसिद्ध झाल्या असून त्यांची पाहणी केली असता यामध्ये प्रचंड घोळ असल्याचे दिसून येत आहे . सदरील याद्या दुरुस्त करण्यासाठी मतदारांकडून आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया चालू झाली आहे .यासाठी शेवटची तारीख १३ ऑक्टोबर होती .परंतु निवडणूक आयोगाकडून ही तारीख …
Read More »Shabdraj
पूर्णा पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत
पूर्णा:(सुशीलकुमार दळवी) पूर्णा पंचायत समितीच्या बारा गणांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.13) दुपारी तीन वाजता पूर्णा येथील तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थित काढण्यात आली. यावेळी तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे व्यंकटेश जेजुरवार आदीची उपस्थिती होती. यावेळी गणांच्या आरक्षणाची सोडत एका लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून करण्यात आली. या आरक्षणात पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी, फुलकळस, वझूर, गौर …
Read More »बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
पुणे,दि 13 ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मोठी घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2025- 26 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे …
Read More »परभणी जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चीत,वाचा सविस्तर
परभणी, दि. 13 परभणी जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 अन्वये आरक्षण कार्यक्रम दिल्याप्रमाणे परभणी जिल्हा परिषदेच्या एकूण 54 निवडणूक विभागाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. त्यानुसार निवडणूक विभागास आरक्षण …
Read More »वरद लांडगेची चमकदार कामगिरी; विभागीय जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – परळी येथील न्यू हायस्कूल शाळेचा विद्यार्थी चिरंजीव वरद श्रीराम लांडगे (इयत्ता आठवी) याने विभागीय जलतरण स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. फक्त पहिल्याच प्रयत्नात विभागीय विजेतेपद मिळवून वरदने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून हा परळी तालुका व न्यू हायस्कूल शाळेसाठी अभिमानाचा क्षण ठरला असून आगामी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये तो आता बीड जिल्ह्याचे …
Read More »जिल्हा परिषदेच्या राजपत्रित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे वेतन
परभणी : – दि. १३ ऑक्टोबर परभणी जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अतिवृष्टी व पुरामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या दोन दिवसांच्या वेतनाचे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहे. परभणी जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संवर्गात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी यांचा …
Read More »कुणाच्या चेहऱ्यावर हसू तर कोणाच्या कपाळावर आठ्या:झेडपी आरक्षण
कैलास चव्हाण परभणी/हिंगोली दि 13 ः कुणाच्या चेहऱ्यावर हसू तर कोणाच्या कपाळावर आठ्या तर कोणी स्तब्ध अशा अनेक भावमुद्रा जिल्हा परिषदेच्या राजकीय आखाड्यातील पुढार्यांच्या पाहायला मिळाल्या. काही खुशी कही गमचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले. निमित्त होते जिल्हा परिषदेच्या गटनिहाय आरक्षण सोडतीचे आजच्या सोडतीने परभणी हिंगोली जिल्ह्यातील अनेक मातब्बर आणि प्रस्थापीतांना मोठे धक्के मिळाले आहेत त्यामुळे आता निवडणुकीचा उडू द्या …
Read More »मानसिक आरोग्यात व्यक्तीसोबत समाज, देश व जग बदलण्याची ताकत – डॉ. गोविंद यादव
परभणी – येथील शारदा महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करताना जिल्हा सामान्य रुग्णालय परभणीचे मनोविकारतज्ञ डॉ. गोविंद यादव म्हणाले की, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण मानसिक आरोग्यात व्यक्तीसोबत समाज, देश व जग बदलण्याची ताकत आहे. मानसिक आजार, मानसिक विकृतीचे परिणाम व्यक्ती, कुटुंबासह सर्व समजाला भोगावे लागतात. असंख्य व्यक्तींना मानसिक आजाराची ओळख नसल्याने मानसोपचार घ्यायला तयार होत …
Read More »विद्यार्थ्यांनी बनविले आकाशकंदील
सेलू / प्रतिनिधी – शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशाकंदील तयार केले.दीपावली सणानिमित्त कार्यानुभव विषयाअंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी,नवनिर्मिती क्षमता विकसित होण्यासाठी स्वनिर्मित आकाशकंदील तयार करण्याचा उपक्रम सौ.रागिणी जकाते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या कलाकृतीचे स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी,कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर,शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक …
Read More »दिव्यांगाचा आत्मसन्मान वाढवणारे मोदीजी सारखे संवेदनशील नेत्रत्व देशाला मिळाले-पालकमंत्री ना.मेघनादीदी बोर्डीकर
सेलू / प्रतिनिधी – पूर्वी असलेला अपंग शब्द वगळून त्यांना दिव्यांग संबोधून त्यांचा आत्मसन्मान वाढवण्याचे व त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम देशातील संवेदनशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे .असे प्रतिपादन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सेलू येथील कार्यक्रमात बोलतांना स्पष्ट केले . परभणी जी प चे माजी सभापती अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com