05/02/26
Breaking News

Shabdraj

‘छावा’च्या पदाधिकार्‍यांवरील हल्ल्याचा परभणीत जोरदार निषेध

परभणी,दि.21(प्रतिनिधी) : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे यांच्यासह सहकार्‍यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी भर दिवसा वरिष्ठ नेतेमंडळींसमोर केलेल्या अमानुष मारहाणीचा येथील मराठा सेवा मंडळ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना यासह अन्य संघटनांनी सोमवारी (दि.21) संयुक्तपणे जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व सुरज चव्हाण यांच्या प्रतिमांना या संतप्त आंदोलनकर्त्यांनी जोडे मारले. …

Read More »

पेडगाव फाटा ते रेल्वे स्टेशन रस्ता उखडला,ग्रामपंचायतने केली रस्ता दुरुस्तीची सीईओंकडे मागणी

परभणी,दि.21(प्रतिनिधी) : परभणी ते मानवत या राष्ट्रीय महामार्गावरील पेडगांव फाटा ते पेडगांव रेल्वेस्थानकापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अक्षरशः भयावह झाली असून जिल्हा परिषद प्रशासनाने या रस्त्याच्या मजबुतीकरणासह डांबरीकरणाचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी पेडगांव ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सोमवारी सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची ये-जा आहे. परंतु, रस्ता पूर्णतः उखडला आहे. आदळ आपट …

Read More »

आगामी निवडणुका ताकदीने लढविणार : परभणीत शिवसेना व रिपब्लिकन सेनेद्वारे निर्धार

परभणी,दि 21 ः परभणी महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही शहराचा विकास झालेला नाही. काँग्रेसने परभणीच्या विकासाला ओहोटी आणली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन युतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवेल असा विश्‍वास शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्रात युतीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण …

Read More »

हनी ट्रॅपमध्ये चार मंत्री कोण….संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ….

नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्री आणि बडे अधिकारी हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याच प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याकडून ३ कोटी उकळल्याचंही प्रकरण ताजं आहे. या हनी ट्रॅप प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ट्रॅपमध्ये ४ मंत्री आणि १५ आमदार अडकल्याची दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे आमदार …

Read More »

जितेंद्र आव्हाडांनी सगळंच बाहेर काढलं, कोकाटेंच्या ‘त्या’ व्हिडीओने खळबळ

जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ ट्वीट केले आहेत. जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ ट्वीट केले आहेत.   कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी हा पत्त्यांचा गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला …

Read More »

गुरुवारी होणार राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन..परभणीत बैठक

परभणी – शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार मानधन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दिनांक २४ जुलै २०२५ रोजी राज्यभर होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी आज परभणी येथील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नियोजन बैठक पार पडली. संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यातील एकूण सात ठिकाणासह परभणी शहरालगत असलेल्या एमआयडीसी गेटवरील शासकीय दुध डेअरी समोरील वसमत रोडवर सकाळी ११ ते १ या कालावधीत होणाऱ्या …

Read More »

शिल्पकार प्रकाश दाढेल लोककलावंत मानधन पासून वंचित

 पाथरी,दि 21 (प्रतिनिधी)ः पाथरी येथील अजिंठा आर्टचे शिल्पकार प्रकाश दाढेल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून थोर महापुरुष व विविध देवदेवतांच्या मूर्ती बनवितात.मात्र त्यांना अद्यापही शासनाच्या वतीने लोककलावंत चे मानधन मिळाले नाही.मानधन शासनाने सुरू करावी अशी मागणी शिल्पकार प्रकाश दाढेल यांनी केली आहे. पाथरी येथील अजिंठा आर्टचे प्रसिद्ध शिल्पकार प्रकाश दाढेल हे शिल्पकार तथा कलावंत म्हणून ओळखले जाते.त्यांनी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा …

Read More »

मंत्र्याच्या वक्तव्याचा सेलूत शिवा संघटनेच्या वतीने निषेध

सेलू / प्रतिनिधी – राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी जगतज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांचा विधिमंडळ सभागृहात बोलताना केलेल्या ऐकेरी उल्लेखाचा अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना तालुका शाखा सेलूच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला.   निवेदनात म्हटले आहे की संजय सिरसाटांनी महात्मा बसवेश्वरांचा ऐकेरी उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला आहे, त्यामुळे विरशैव समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या …

Read More »

मंत्र्याच्या वक्तव्याचा सेलूत शिवा संघटनेच्या वतीने निषेध

सेलू ( प्रतिनिधी ) राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी जगतज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांचा विधिमंडळ सभागृहात बोलताना केलेल्या ऐकेरी उल्लेखाचा अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना तालुका शाखा सेलूच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की संजय सिरसाटांनी महात्मा बसवेश्वरांचा ऐकेरी उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला आहे, त्यामुळे विरशैव समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत …

Read More »

श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न

पूर्णा,दि 19 ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे मागील ६ वर्षांपासून श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये ५०० पेक्षा जास्त पदवीधारक विदयार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महाविद्यालयात ५ व्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पूजनाने व विद्यापीठ गीताने करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील ७३ पेक्षा जास्त विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी …

Read More »