रामप्रसाद ओझा, गंगाखेड,दि 07 ः गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला राखीव जाहीर झाले असून, तेरा प्रभागांतील एकूण २६ जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. महिला सहभाग, नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही आरक्षण प्रणाली अस्तित्वात असली तरी प्रत्यक्षात मात्र सार्वजनिक क्षेत्रात अथक परिश्रम घेणाऱ्या, सामाजिक कामाचा भक्कम पाया असलेल्या सक्षम …
Read More »महाराष्ट्र
गंगाखेडात नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीकडून सौ. निर्मला तापडिया यांना उमेदवारी
रामप्रसाद ओझा गंगाखेड,दि 07 ः शहर विकास आघाडी तर्फे गंगाखेड नगराध्यक्ष पदासाठी सौ. निर्मला गोपालदास तापडिया यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. आघाडीचे नेते आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी ही घोषणा करताच उपस्थित कार्यकर्त्यांकडून टाळ्यांच्या गजरात आणि जल्लोषात त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत तेरा प्रभागांसाठीच्या सर्व २६ जागांच्या उमेदवारांची घोषणा देखील लवकरच करण्यात येणार असल्याची …
Read More »गंगाखेडच्या गौरव दामा यांचे युजीसी परीक्षेत यश
रामप्रसाद ओझा गंगाखेड,दि 05 गंगाखेडचे सुपुत्र गौरव (गौरीशंकर) संजय दामा यांनी आपल्या परिश्रम, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या बळावर संपूर्ण भारतभर आपले नाव उज्ज्वल केले आहे. युजीसी अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत दहालाख हून अधिक विद्यार्थ्यांमधून यश संपादन करत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापकपदी त्यांची निवड झाली आहे. गौरव दामा हे गंगाखेड नगरपरिषदेचे …
Read More »पूरग्रस्त शेतकऱ्यांना भारतीय किसान संघाकडून हरभरा बियाण्यांचे मोफत वाटप
गंगाखेड,दि 05 ः अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीकच वाहून गेले असताना, त्यांना आधार देण्यासाठी भारतीय किसान संघ पुढे सरसावला आहे. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी संवेदनशील पाऊल उचलत संघाकडून परभणी जिल्ह्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हरभरा बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. दि. ०३ नोव्हेंबर रोजी परभणी, पुर्णा, पालम आणि गंगाखेड तालुक्यातील एकूण पाच गावांमधील १० शेतकऱ्यांना हा थेट लाभ मिळाला. पिकांचे १०० …
Read More »सेलूत पालीकेच्या कोंडवाड्यात चारा,पाण्या अभावी गाईचा मृत्यू झाल्याची तक्रार
सेलू( प्रतिनिधी ) सेलू नगर परिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे व चारा पाण्या अभावी आपली कोंडवाड्यातील गाय मरण पावल्याची तक्रार रामेश्वर नारायण बरडे यांनी दिली आहे. सेलू नगर परिषदेच्या वतीने शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली आहे .त्यामध्ये दि ३ /११/२५ रोजी रामेश्वर नारायण बरडे यांची गाय कोंडवाड्यात बांधण्यात आली होती .हे समजताच बरडे यांनी वारंवार नगर परिषद कार्यालयात …
Read More »आकडेखोर ठेकेदाराचे बील पुर्णा पालीकेच्या मुख्याधिका-यांच्या माथी
पुर्णा,दि.५(प्रतिनिधी) महावितरणच्या कारभारातील ढिसाळपणा, ठेकेदारांस पाठीशी घालण्यासाठी सुरू केलेला संगनमताचा खेळ आणि या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी वर्गाचा थंड निष्क्रियपणा या त्रिसंधीने पुर्णा शहरात वीजचोरीचे प्रकरण अक्षरशः गाजवले आहे. आकडेखोर ठेकेदाराने उघडपणे वीजचोरी करून महावितरणला चुना लावला,पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र कारवाई ऐवजी ‘थातुरमातुर नाटक’ रचून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. धक्कादायक म्हणजे या चोरीचे बील ठेकेदाराऐवजी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर फाडल्याची माहिती पुढे …
Read More »वैकुंठ चतुर्दशी निमित्त ‘हर-हरी भेट’ उत्सव थाटामाटात
गंगाखेड / रामप्रसाद ओझा – वैकुंठ चतुर्दशी निमित्त शहरातील प्राचीन हेमाडपंथी श्री सोमेश्वर शिवालय (अंधारी महादेव) येथे भगवान श्री व्यंकटेश व श्री सोमेश्वर यांची पारंपरिक ‘हर-हरी भेट’ उत्सवपूर्वक संपन्न झाला. गेल्या तीन वर्षांपासून साजरा होत असलेला हा दैवी मिलाप सोहळा भाविकांसाठी भक्ती, अध्यात्म व सांस्कृतिक एकात्मतेचा अनुभव ठरला. उत्सवापूर्वी लॉ. व्यंकटेश्वर मंदिरातील भगवान व्यंकटेश यांची उत्सव मूर्ती शहरातील राजवाडा, …
Read More »आजपासून नरसिंह मंदिरात कार्तिकी पौर्णिमा उत्सवास उत्साहात प्रारंभ
सेलू / प्रतिनिधी – येथील पांडे गल्ली मधील अत्यंत पुरातन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच संकटात सापडलेल्या भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंह मंदिर मध्ये प्रतिवर्षी प्रमाणेच आज कार्तिकी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला आहे. तीन दिवसीय या महोत्सवात आज दि ५ नोव्हेम्बर रोजी सकाळी श्री च्या मूर्तीस सतीशराव दिग्रसकर यांच्या वतीने कौस्तुभ दिग्रसकर यांच्या हस्ते लघुरुद्र …
Read More »निवडणूक आयोगाकडून मोबाइल ॲप विकसित,मतदार यादीत नाव शोधणे होणार सोपे
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान; तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. राज्यातील एकूण 247 पैकी 246 नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होत …
Read More »मराठवाडयातील या 48 नगरपरिषदा व 11 नगरपंचायतीमध्ये होणार निवडणुक
लोकसभा निवडणुकीत 8 खासदार आणि विधानसभेला 48 आमदार सभागृहात पाठवणाऱ्या मराठवाड्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. येथे 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांचाही बिगुल वाजणार आहे. मराठवाडा विभागातील संपूर्ण आठ जिल्ह्यात मिळून 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती नगरपरिषद आणि किती …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com