24/06/26
Breaking News

महाराष्ट्र

माझे सर्वस्व हरपले, पण मी खचणार नाही:प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावुक

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. बारामतीच्या ऐतिहासिक शारदा प्रांगणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी आपल्या पतीच्या आठवणींनी सुनेत्रा पवार यांना अनेकदा गहिवरून आले. मी माझे सर्वस्व हरपले, पण मी थांबणार नाही, खचणार नाही, मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या …

Read More »

गंगाखेडमध्ये परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

गंगाखेड | प्रतिनिधी : गंगाखेड शहरात श्री भगवान परशुराम जयंती तसेच महात्मा बसवेश्वर जयंती हे दोन्ही उत्सव मोठ्या भक्तिभावात, सामाजिक जाणीवेतून व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, जयघोष, भजन-कीर्तन आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. परशुराम जयंती – भव्य शोभायात्रा व धार्मिक सोहळा श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त काल सायंकाळी ५ वाजता …

Read More »

उन्हाचा तडाखा आणि नियोजनाचा फटका; पाथरीत शेतकऱ्यांचा भाजीपाला सुकला!

पाथरी प्रतिनिधी पाथरीतील आठवडी बाजार पुन्हा मूळ जागेवर भरवण्याची मागणी; नगर परिषद सदस्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन ​पाथरी (प्रतिनिधी):पाथरी शहरातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार’ कोणत्याही अधिकृत ठरावाशिवाय जुन्या, अपुऱ्या जागेत हलवण्यात आल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हा बाजार पुन्हा त्याच्या मूळ जागेवर भरवण्यात यावा, या मागणीसाठी नगर परिषदेच्या अनेक सदस्यांनी उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांना निवेदन …

Read More »

भारतीय संविधान समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – उत्तम कांबळे

सेलू ( प्रतिनिधी ) संविधान संघर्षाचा विषय आहे. संघर्षातून नवीन जग निर्माण होते. संविधानाने पराभूत माणसांचा इतिहास बदलून विजेत्या माणसांचा इतिहास रचला. भारतीय संविधाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. भारतीय संविधान लढण्याचे, जगण्याचे हत्यार आहे. समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे ( नाशिक ) यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सार्वजनिक …

Read More »

संकल्प मानव विकास संस्थेची शासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

रमेश बिजुले पाथरी,दि 21  येथील हॉटेल प्रियल येथे आज दिनांक २१ एप्रिल रोजी संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक संपन्न झाली. संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी संचालक  सुधाकरराव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न, महिला-बाल आरोग्य आणि कामगारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. …

Read More »

पिक विम्यासाठी कृषी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा.

सेलू दि १७ आज दि.17/4/2026रोजी तालुका कृषी अधिकारी सेलू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेखरिप २०२५ च्या पिक विम्यातून कुपटा, मोरेगाव, चिकलठाणा, वालूर महसूल मंडळ वगळल्यात आले आहे . याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन बेमुद्दत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे . २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी अतिवृष्टी पाऊस झालेला होता तसेच दूधना नदी, कसूरा नदी, करपरावर नाल्याच्या …

Read More »

म.बसवेश्वर जयंती साजरी करण्याची शिवा संघटनेची मागणी

सेलू ( प्रतिनिधी ) मध्ययुगीन काळातील महान संत समता नायक , विरशैव धर्मप्रसारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासन निर्णया प्रमाणे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी अशी मागणी शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी सेलू यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ना.तहसिलदार कृष्णा देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की १९ एप्रिल रविवार रोजी अक्षयत्रतियेच्या …

Read More »

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्या निमित सेलूत शिबिरात ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सेलू ( प्रतिनिधी ) श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत येथील महेशनगर मधील श्री स्वामी समर्थ व बाल संस्कार केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ९ते १५ एप्रिल दरम्यान गुरु चरित्र पारायण व नाम जप यज्ञाचे आयोजन करण्यात आले . ७ एप्रिल मंगळवार रोजी श्रीची पालखी काढून नगर …

Read More »

गोवंश जनावरांची वाहतूक करणारी आठ वाहने सेलू पोलिसांनी पकडली

सेलू ( प्रतिनिधी ) शहरातील रायगड कॉर्नर या ठिकाणी दि १६ एप्रिल रोजी पहाटे पाच च्या सुमारास अवैधरित्या गोवंश जनावरे वाहतूक करीत असताना एकूण सात पिकप आणि एक आयशर अशी वाहने मिळून आल्याने त्यावरील चालकांविरोधात सेलू पोलीस स्टेशन येथे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एकूण अकरा आरोपी असून सदर गुन्ह्यामध्ये बैल जातीचे गोवंश ४५ जनावरे जप्त करण्यात …

Read More »

एसटीच्या तिकीट दरांत भरमसाठ वाढ,सफाई खर्चाचा बोजा प्रवाशांवर

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी तिकीट दरात 10 टक्क्यांची हंगामी वाढ जाहीर केली असून, प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त 2 रुपयांचा स्वच्छता अधिभारही लागू केला आहे. या निर्णयामुळे गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल-मे महिन्यात शाळा आणि …

Read More »