शेख वाजीद जिंतूर,दि 21 ः राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व सकल मराठा समाज व पुरोगामी महाराष्ट्र यांच्या वतीने बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 68 रक्तदात्यांनी रक्तदान करून मातृत्वाला अभिवादन केले. भारत देशाला दोन छत्रपती देणाऱ्या माँ साहेब जिजाऊ व सर्वसामान्य माणसाला शिक्षणाचे दार …
Read More »महाराष्ट्र
भाजपा नेते विलास बाबर राष्ट्रवादीत… पोखर्णी जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल
परभणी,दि.21(प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर यांनी बुधवार 21 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्याने भाजपास सोडचिठ्ठी दिली अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पोखर्णी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पोखर्णी या गटातून आपणास उमेदवारी जाहीर केली जाईल, एबी फॉर्मही दिला जाईल, असे भाजपाच्या श्रेष्ठींनी नमूद केले होते. त्यामुळे ते दुपारी 1 वाजेपर्यंत एबी …
Read More »सेलूच्या श्रीमती सुरेखा आहेरकर-पाटवकर यांना कर्तृत्ववान माता सन्मान पुरस्कार जाहीर
सेलू ( प्रतिनिधी ) मानव सेवा विकास प्रतिष्ठान परभणीच्या वतीने “कर्तृत्ववान मातांचा सन्मान पुरस्कार” सेलू येथील श्रीमती सुरेखा आहेरकर-पाटवकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार सन्मान सोहळा प्रतिष्ठांणच्या वतीने परभणी येथे २१ जानेवारी ते २५जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या आई महोत्सवामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. सुरेखा आहेरकर या आहेर बोरगाव येथे नितीन माध्यमिक विद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे दहावी शिक्षण …
Read More »मीटरला रिडींग दिसत नसल्याचे कारण दाखवून वीज ग्राहकांची अडवणूक
सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरात सध्या विजेच्या मीटर चे बिल जास्त आल्याच्या तक्रारी वाढत असून वीज ग्राहकांना महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत .यामुळे ग्राहकाच्या प्रचंड नाराजी पसरत असून लवकरच यासाठी आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते . शहरात सध्या मीटर रिडींग चे काम एका खाजगी कंपनीला दिल्यागेले असून त्यांचे कर्मचारी घरोघरी जाऊन वीज ग्राहकांची मीटर रीडिंग घेऊन …
Read More »सेलूमध्ये निवडणूक पूर्वतयारीचा आढावा बैठक संपन्न,१३० मतदान केंद्राची निश्चिती
सेलू ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, या अनुषंगाने सोमवारी १९ जानेवारी रोजी सेलू तहसील कार्यालयात निवडणूक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला निवडणूक निर्णय …
Read More »नाव वेगळे? काळजी करू नका! आता सीईटी अर्ज आता रद्द होणार नाही
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करताना काही विद्यार्थ्यांना आधार कार्ड, अपार आयडी किंवा दहावी-बारावीच्या प्रमाणापत्रावर नाव वेगळे असल्यामुळे चिंता होती. मात्र सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे की अशा नावातील फरकामुळे अर्ज रद्द होणार नाही.ती दुरुस्त करता येईल. सध्या सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, अनेकांना नाव, जन्मतारीख किंवा इतर वैयक्तिक तपशील भरण्यात अडचणी येत होत्या. या समस्येवर लक्ष देत कक्षाने …
Read More »अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करा! राज्यभरात सरकारविरोधात संताप
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत. केवायसीमध्ये संभ्रमात टाकणारे प्रश्न विचारण्यात आल्याने त्यांना उत्तरे देऊनही अनेकांचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता बंद झाला आहे. यामुळे या महिला त्रस्त झाल्या असून ही लाडकी बहीण योजनाच बंद करा अशी धक्कादायक मागणी आज यवतमाळमध्ये आंदोलनाला बसलेल्या लाडक्या बहिणींनी केली आहे. यवतमाळ, वर्धा,हिंगोली,वाशीम,अमरावती, बुलढाण्यात हजारो महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठरू लागल्या आहेत. गेल्या …
Read More »महिलांच्या स्वावलंबनासाठी शुभंकरोती फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीयच- उदय जाधव
सेलू ( प्रतिनिधी ) शुभंकरोती फाऊंदेशन चे कार्य निश्चितच महिलांच्या स्वावलंबनासाठी उलेखनियच ठरणारे आहे .असे प्रतिपादन सेलू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय जाधव यांनी प्रशिक्षण केंद्राच्या भेटी दरम्यान केले . महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या शुभंकरोती फाउंडेशन, सेलू येथे महिलांसाठी सुरू असलेल्या ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्रास आज श्री. उदय जाधव तसेच श्री. भाऊसाहेब …
Read More »श्री संत गोविंद बाबा मठात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन
सेलु,ता 20 ः येथील श्री संत गोविंदबाबा महाराज (दादुपंथी ) यांच्या पुण्यतिथी निमित्त मठ संस्थानामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व प्रवचनाचे आयोजन दिनांक २६ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या अखंड हरिणाम सप्ताहात सकाळी ४ ते ६काकडा भजन, ८ ते १० ज्ञानेश्वरी प्रवचन, १० ते १२ गाथा भजन, दुपारी ४ ते ६ ज्ञानेश्वरी प्रवचन, सायंकाळी ६ ते …
Read More »न्यू हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय सेलू येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू हायस्कूल शाळेचे सदस्य तथा साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आढळकर होते. उदघाटक म्हणून स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद परभणीचे माजी सभापती अशोक काकडे यांची उपस्थिती होती . मुख्याध्यापक धनंजय भागवत, शालेय समितीचे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com