सेलू / नारायण पाटील – येथील नूतन इंग्लिश स्कूल, सेलू या विद्यालयाचा बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू असा नामविस्तार सोहळा उत्साहात संपन्न झाला. सी.बी.एस.सी. दर्जा प्राप्त बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू नामविस्तार कोनशिलेचे अनावरण रविवार ( दि. १५) रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी श्रीगोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय …
Read More »महाराष्ट्र
आपल्यातील सुखाचा शोध घ्या – बंडा तात्या कराडकर
सेलू ( प्रतिनिधी ) जगात सद्गुरू बद्दल सर्वांचे एकमत आहे. पण सुख शोधण्याची जागा चुकली आहे. माणसे बाहेर सुख शोधत आहेत. पण सुख आपल्यापाशीच आहे. तेव्हा आपली सुप्त शक्ती जागृत करा. आपल्यातील सुखाचा शोध घ्या. देवाकडे ऐश्वर्य, सत्ता, औदार्य हे तिनही गुण आहेत.जो विठ्ठलाला शरण जातो त्याला काहीही कमी पडत नाही. गतीला योग्य दिशा असेल तरच प्रगती होते. असे प्रतिपादन …
Read More »अवैध वाळू प्रकरणी बातम्या लिहिल्याचा राग; पत्रकाराला धमकी दिल्याचा आरोप, तलाठ्यावर कारवाईची मागणी !
पाथरी प्रतिनिधी तालुक्यातील डाकूपिंपरी परिसरातील अवैध वाळू उत्खननाबाबत वारंवार बातम्या प्रकाशित केल्याचा राग मनात धरून महसूल विभागातील तलाठी अरविंद चव्हाण यांनी पत्रकार गजानन घुंबरे यांच्या विरोधात धमकीवजा भाषा वापरून कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी गजानन घुंबरे यांनी १ …
Read More »17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
मुंबई, दि. 13 मार्च: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. …
Read More »जिद्द व परिश्रमाने यश प्राप्त होते-करुणा कुलकर्णी
सेलू /प्रतिनिधी कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य,नियोजित अभ्यास व योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्कीच आपल्याला मिळते असे मत करुणा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. बी.डी. एस. (ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप ) व N. M. M. S. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) …
Read More »सेलू शहरात स्मार्ट मीटरच्या सक्ती वरून नागरिकांमध्ये संताप
सेलू (प्रतिनिधी) सेलू शहरात वीज ग्राहकांच्या घरांमध्ये एनसीसी लिमिटेड कंपनीमार्फत नवीन स्मार्ट/डिजिटल मीटर बसविण्याचे काम सुरू असून हे मीटर नागरिकांच्या संमतीशिवाय बळजबरीने बसविले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकाराविरोधात नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन ही कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक …
Read More »महिला दिनानिमित्त नगरपरिषद च्या वतीने महिला मेळावा संपन्न
बचत गटास सन्मानचिन्ह देऊन गौरव पुर्णा / सुशील दळवी – पुर्णा नगर परिषद, पूर्णा दीनदयाळ जनअजिविका अभियान (DJAY) स्वाभिमान शहर स्तर संघ संचलित सोनचिरैया शहर उपजिवीका केंद्र, पुर्णा यांच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तसेच याचे मेळाव्याच्या सुरुवातीस स्वाभिमान शहर स्तर संघ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती …
Read More »जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र महाभारत देते- स्वामी गोविंददेव गिरीजी
महाभारत संदेश कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू / प्रतिनिधी – चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार वर्ण, चार साधना याचे सर्व ज्ञान असलेला एकमेव महाभारत हा ग्रंथ आहे. नित्य महाभारत श्रवणाने बुध्दी तिक्ष्ण होते. यशस्वी होण्याचा मुलमंत्र महाभारत कथा देते. असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. शहरातील सातोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत गुरूवार ( दि.१२ ) रोजी …
Read More »सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज
सेलू( प्रतिनिधी) शहरात १२ मार्च ते १९ मार्च कालावधीत संपन्न होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यासाठी अलंकापुरी नगरी सज्ज झाली आहे. ११ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता सेलूचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. अलंकापुरी पारायण, कथा स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. पारायण सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम १२ मार्च ते १९ मार्च या कालावधीत अलंकापुरी नगरी, …
Read More »महिला दिनानिमित सेलूत वेशभुषा स्पर्धा व महिलांचा सन्मान सोहळा संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपति शिवाजी नगर हनुमान मंदीर परिसरात शालेय विद्यार्थीनी साठी वेशभुषा स्पर्धेचे व ५१कर्तत्वान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला शहरातील कै . डॉ . अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट , आस्था सेवाभावी संस्था अधिराज मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सामाजिक कार्यकर्ता सुनील गुलाबराव गायकवाड मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्दयमाने आयोजीत सन्मान नारिशक्तीचा व मुलींनसाठी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com