26/08/26
Breaking News

महिलांच्या सक्षमीकरणांसाठी काम करणाऱ्या महिलांनी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

परभणी, दि. ८  : महिलांच्या सक्षमीकरणासाठी कामकाज करणाऱ्या महिलांची दखल घेण्याकरीता केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी (पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण व इतर) नामांकन सादर करण्यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल व संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे.

 

नामांकन दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत सादर करता येणार असून, पुरस्कारांची घोषणा दि. २६ जानेवारी २०२७ रोजी करण्यात येणार आहे.

 

पुरस्कारासाठी पात्र महिलांचे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर विहित कालावधीत माहिती सादर करणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त महिलांनी आपले नामांकन सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एम.एस. रंधवे यांनी केले आहे.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …