26/08/26
Breaking News

एका दिवसासाठी CM झालात तर?:तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर; म्हणाले..

who is Tukaram Mundhe ?

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असतानाच, एका मुलाखतीत त्यांनी ‘एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचीही मोठी चर्चा होत आहे.

 

एफडीएचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळविरोधी कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध शहरांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणावर धाडी टाकण्यात आल्या. अस्वच्छ किचन, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि भेसळयुक्त उत्पादनांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, पनीर, दूध, दही, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात एफडीएने सुरू केलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत अधिक आक्रमक आणि सातत्यपूर्ण कारवाया होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडूनही या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांची बदली होणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. या चर्चेनंतर सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी त्यांना पदावर कायम ठेवण्याची मागणी केली. अखेर सरकारने अशा कोणत्याही बदलीचा निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला.

Check Also

समाजसेवेला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड; धार्मिक व सामाजिक संस्थांसाठी SAMAVET बनत आहे विश्वासार्ह तंत्रज्ञान भागीदार

पुणे  ,दि 30 (प्रतिनिधी)ः भारतात डिजिटल परिवर्तनाचा वेग सातत्याने वाढत असून त्याचा प्रभाव आता धार्मिक, …