सोनपेठ दि.२९ (प्रतिनिधी) ऊसाला प्रती टन तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खडका व सायखेडा पाटीवर टायर जाळुन ऊस तोड व वाहतुक बंद करण्याचा इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाच्या पहिल्या उचली साठी सुरु केलेल्या आंदोलनाचे लोन आता सोनपेठ तालुक्यात पसरु लागले आहे. सोनपेठ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक बैठक घेऊन ऊसाला पहिली …
Read More »Shabdraj
कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विज्ञान प्रदर्शनातून विकसित होतो – उदय जाधव
सेलू / प्रतिनिधी विज्ञानाच्या रोमांचक आणि व्यावहारिक पैलूंचे प्रदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत,त्या विषयात रस निर्माण करण्यात विज्ञान प्रदर्शने सहाय्यभूत ठरतात.तसेच कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत करतात असे मत सेलू येथील गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी व्यक्त केले.पंचायत समिती व विवेकानंद विद्यालय सेलू आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या (ता.२८ नोव्हेंबर) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की ,भविष्यातील …
Read More »अजित पवार यांनी घेतली मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणाची विचारपूस केली. हत्येला एक वर्ष झाले, तरी दादा अजून आम्हाला न्याय मिळाला नाही, अशी खंत वैभवी देशमुख हिने व्यक्त केली. तर गावकऱ्यांनी देखील अजित पवारांकडे न्यायाची …
Read More »उजळांबा येथे रविवारी पार्वती परमेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा
परभणी,दि 28 परभणी तालुक्यातील उजळांबा येथील वसंत विलास फॅमिली रेस्टॉरंटच्या परिसरात पार्वती परमेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा तसेच महंत,महाराज यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी (ति.30) करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महादेवाची प्राणप्रतिष्ठा ष.ब्र.प.पू. काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर आणि कीर्तन महर्षी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प. जनार्दन महाराज …
Read More »राज्यातील सर्व शाळा ५ डिसेंबरला बंद राहणार
मुंबई,दि 28 ः राज्यातील सर्व शाळा येत्या ५ डिसेंबरला बंद राहणार आहे. राज्यव्यापी शिक्षक संघटनेने संपाचा इशारा दिला असून, विविध मागण्यांबाबत तो आयोजित केला जात आहे. त्यामुळे त्या दिवशी शिक्षक शाळेत उपस्थित राहणार नाहीत, आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. शिक्षक संघटनेची मागणी अशी आहे की, २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करणे बंद करावे. आणि १५ …
Read More »टांगती तलवार कायम; वाचा निकालातले ५ महत्त्वाचे मुद्दे!
सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले. महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगर पालिका या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याची बाब समोर आली आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने अंतरिम आदेश दिले व पुढील सुनावणी २१ जानेवारी रोजी करण्याचे निर्देश दिले. यावेळी निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला …
Read More »राम जन्मभूमी अयोध्येत धर्मध्वज स्थापना; परभणीत उत्साहात आनंदोत्सव
परभणी / प्रतिनिधी – अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. पाचशे वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला या ध्वजरोहणामुळे प्रतीकात्मक पूर्णविराम मिळाल्याचा आनंद देशभरात व्यक्त करण्यात आला. या निमित्ताने परभणी शहरातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. व्यंकटेश मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात …
Read More »सेलू येथे ४ डिसेंबर रोजी दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन
सेलू / प्रतिनिधी – येथील ब्राम्हण गल्ली मधील दत्त मंदिर मध्ये दत्त जयंती निमित्त दत्तजन्मोसव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . दि २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी दत्त मूर्तीस अभिषेक तसेच सकाळी ७ ११ या वेळेत गुरुचरित्र पारायण व त्यानंतर भिक्षाफेरी,दत्त पंचपदी व आरती होणार आहे . मधुकरराव वाकडीकर ,अरुनराव वाकडीकर ,रेणूकादासराव …
Read More »श्रीरामजी भांगडिया यांचा बोलण्यापेक्षा कृतीवर भर होता – प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी
सेलू ( प्रतिनिधी ) दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांचे स्वातंत्र्य आंदोलन, हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रिय योगदान होते. त्यांची संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मुल्यांवर निष्ठा होती. ते विचारापेक्षा कृतीवर भर देत. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. ते ‘ श्रीरामजी भांगडिया यांचे जीवन – कार्य’ या विषयावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने दलितमित्र श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती …
Read More »सेलूत रंगभरण चित्रकला स्पर्धेला मोठा प्रतिसाद
सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आणि सेलू शहर विकासाचे शिल्पकार पहिले नगराध्यक्ष दलितमित्र कै.श्रीरामजी भांगडीया यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, ता.२६ नोव्हेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन नूतन विद्यालयात सकाळी ९ वाजता करण्यात आले. स्पर्धेला विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ६६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सेलू शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेचे हे १८ वर्षे आहे. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com