पूर्णा प्रतिनिधी (सुशिलकुमार दळवी): गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरात समाजहिताचे अनेक उपक्रम राबवून वाढदिवसाचा सोहळा आगळा-वेगळा साजरा करण्यात आला.दि.१२ ऑगस्ट रोजी गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात रक्तदान, महिलांसाठी साडीवाटप आणि दिव्यांग मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन अशा तिन्ही उपक्रमांचा समावेश होता. सकाळी गुट्टे काका मित्र मंडळाच्या संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले …
Read More »Shabdraj
आता अवघ्या काही तासात जमा होणार धनादेश
मोठ्या व्यवहारांसाठी चेक दिला जातो, काहींचे पगारही चेकद्वारे आजही काढले जातात. मग अशावेळी पैसे खात्यावर येण्यासाठी वाट पाहावी लागते. चेक देणारा आणि घेणाऱ्याची बँक एकच असेल तर एक दिवसात चेक क्लिअर होतो. मात्र एका बँकेतून दुसऱ्या बँकेत चेक जाणार असेल तर त्यासाठी एक दोन तीन पैकी कितीही दिवसांचा अवधी लागतो. मात्र आता ही सगळी कटकट संपणार आहे. तुमच्या खात्यावर अवघ्या …
Read More »परभणीच्या आर. पी. हॉस्पिटलच्या तत्परतेमुळे सात वर्षीय बालकाचे प्राण वाचले
परभणी,दि 14 ः परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाच्या समयसूचकतेमुळे आणि कुशलतेमुळे एका सात वर्षीय बालकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. एका सात फूट खोल गटारात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकावर तातडीने शस्त्रक्रिया करून त्याला नवे आयुष्य देण्यात आले. परभणी शहरात एका भागात एक सात वर्षीय बालक सात फूट खोल गटारात पडला. तब्बल तीन तास बेशुद्ध अवस्थेत गटारात …
Read More »विज्ञाननिष्ठ होणे काळाची गरज-एकनाथ जाधव
सेलू/प्रतिनिधी – विज्ञानाच्या शक्तीची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे,बालपणापासूनच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी .वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होतो त्यासाठी विज्ञाननिष्ठ होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांनी केले. अखिल भारतीय विज्ञान मेळावा अंतर्गत शिक्षण विभाग (पं.स.सेलू ) विवेकानंद प्राथमिक विद्यालय आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ( दि.१३ऑगस्ट,बुधवार) रोजी विवेकानंद विद्यालयात उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे ,गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण …
Read More »ध्येयप्राप्तीसाठी स्वतः मधील कौशल्य विकसित करा – डॉ.अंकित मंत्री यांचे प्रतिपादन
सेलूच्या नूतन विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार उत्साहात सेलू – जीवनात आईवडील आणि शिक्षक यांचे नि:स्वार्थ प्रेम लाभत असते. याची कायम जाणीव ठेवा, त्यांच्या भावना कधीही दुखवू नका. ध्येय प्राप्तीसाठी स्वतःमधील प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा आणि ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करा, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी तथा परभणी येथील प्रसिद्ध अतिदक्षता आणि भूलतज्ज्ञ डॉ.अंकित अशोककुमारजी मंत्री यांनी केले. सेलू येथील नूतन विद्यालयातील …
Read More »केमापूच्या शिक्षकांनी केला अवयवदानाचा संकल्प
सेलू / प्रतिनिधी – हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ता.१३ बुधवार रोजी जि.प.शाळा केमापूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या प्रेरणेने व तालुका आरोग्य अधिकारी कृष्णकुमार चौधरी,उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव दान पंधरवड्या निमित्त मुख्याध्यापक डॉ.शरद ठाकर यांनी उपस्थित ग्रामस्थांची अवयवदान विषयक गैरसमज व अवयवदान आजच्या काळाची गरज याविषयी जनजागृती केली. …
Read More »सेलूत ” मेरी जान तिरंगा है ” कार्यक्रमाचे आयोजन
सेलू / नारायण पाटील – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सेलूतील लोकप्रिय गायक व कलाकारांचा ” आम्ही कलाकार ” या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम दि १५ औगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे . येथील महेशनगर मधील नगर परिषदेच्या साई नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमासाठी अध्यक्षपदी राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा .ना.मेघना साकोरे ( बोर्डीकर )यांची उपस्थिती राहणार …
Read More »अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला सरसावल्या
सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील मौजे हातनूर येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी गावातील महिला सरसावल्या असून त्यांनी याबाबत आज सेलू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बोरसे साहेब यांची भेट घेतली व त्यांना याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजे हातनूर येथे अवैध पद्धतीने देश व विदेशी दारू ची विक्री केली जात आहे. यामुळे मुले, …
Read More »मुलीने मारला बॉयफ्रेंडसाठी थेट घरातच मारला डल्ला, 15 तोळे दागिने अन् रोख रक्कम
छत्रपती संभाजीनगर: आपल्या मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं, त्यांना भविष्यात काही कमी पडू नये यासाठी आईने दिवस-रात्र कष्ट केलं. पण त्याच आईवर पोटच्या मुलीच्या विरोधातच पोलिसांत तक्रार देण्याची वेळ आलीये. छत्रपती संभाजीनगरमधील एका घटनेनं खळबळ उडाली आहे. एका 19 वर्षीय मुलीच्या अल्लड मैत्रीमुळे आईचे 15 तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेलीये. नेमकं प्रकरण काय पाहुया. रक्षाबंधनला उघडलं कपाट.. छत्रपती संभाजीनगरमधील हडको …
Read More »पुस्तके माणसाला समृद्ध करतात : प्राचार्य डॉ. बबन पवार
परभणी,दि 12 ः येथील शारदा महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्यावतीने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक तथा गणित तज्ञ पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अशोक चोपडे उपस्थित होते तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे व …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com