08/11/26
Breaking News

मराठवाडा

हिंगोलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करा; आ.मुटकूळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 हिंगोली (प्रतिनिधी) जिल्ह्याचा शैक्षणिक विकास वेगाने व्हावा आणि स्थानिक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मिळावे, यासाठी हिंगोलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी आमदार तान्हाजीराव मुटकूळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता व गुणवत्ता आहे. मात्र, स्थानिक पातळीवर उच्च व तंत्रशिक्षणाच्या पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.परिणामी, येथील गरीब, शेतकरी, कष्टकरी व सामान्य …

Read More »

विटा येथे महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाचा निर्धार

परभणी | प्रतिनिधी परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश दादा विटेकर यांच्या गावी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरवत शिवसेना उमेदवार सईद भैय्या खान यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीस शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, आमदार राजेश दादा विटेकर, पक्षनिरीक्षक पद्माकर मोराडे, जिल्हा परिषद सदस्य, …

Read More »

लॉयन्स क्लबच्या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा -पोलीस निरीक्षक अरुण नागरे

सेलू ( प्रतिनिधी ) निसर्गोपचार व ॲक्युप्रेशर थेरपी काळाची गरज आहे लॉयन्स क्लब च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पोलिस निरीक्षक अरुण नागरे यांनी केले. येथील माय स्कीन रुगणालयात लॉयन्स क्लबच्या वतीने 09 जून रोजी आयोजित निसर्गोपचार व ॲक्युप्रेशर थेरपी शिबीराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवणारायण मालाणी, अध्यक्ष …

Read More »

आरक्षण उपवर्गीकरणाच्या निषेधार्थ सेलूत मोर्चाचे आयोजन

सेलू ( प्रतिनिधी ) अनुसूचित जाती एस सी च्या आरक्षणात अ ब क ड उपवर्गीकरण करून बदर समिती व महाराष्ट्र शासन हे समाजात फूट पाडून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ सेलूत दि १५ जून सोमवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता भव्य शांतता पूर्ण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . या निर्णयामुळे समस्त आंबेडकरी अनुयायांमध्ये असंतोष पसरला असून हे …

Read More »

 पंचायत समिती वसमत येथे ‘आरोग्य संपन्न गाव कृती दल’ समितीची बैठक संपन्न

हिंगोली,ता 10  ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गावागावांमध्ये आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी  बुधवारी (ता.10)   पंचायत समिती वसमत येथे   ‘तालुका आरोग्य संपन्न गाव कृती दल समिती’ची बैठक घेण्यात आली. सदर बैठक गटविकास अधिकारी  प्रफुल्ल तोटेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ​या बैठकीला वसमत येथील  वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांच्यासह तालुक्यातील सर्व …

Read More »

तोतया पोलिसाने शेतकऱ्याला लुटले:56 हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास

हिंगोली,ता 10ः हिंगोली ते सेनगाव रोडवर सवड शिवारात एका तोतया पोलिसाने शेतकऱ्याची फसवणूक करून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध बुधवारी ता १० गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील रहिवासी असलेले शेतकरी गोविंद लक्ष्मण मूटकुळे मंगळवारी ९ कामा निमित्त हिंगोली येथे आले होते. दुपारच्या …

Read More »

विद्युत पंप चोरणाऱ्या तिघांना अटक:2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली,दि 10  आखाडा बाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून उच्छाद मांडलेल्या विद्युतपंप चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून बुधवारी ता. १० सकाळी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरटे जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. आखाडा बाळापूर परिसरात कालव्यावर तसेच कयाधू नदीवर विद्युतपंप बसवून शेती सिंचन केले जाते. …

Read More »

महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघाच्या राज्य सरचिटणीसपदी मिलिंद सावंत यांची निवड

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या वतीने राज्य सरचिटणीस म्हणून महासंघाच्या नूकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत निवड करण्यात आली आहे. या बैठकीस राज्यभरातून जवळपास 100 नगराध्यक्ष उपस्थित होते, मिलिंद सावंत यांच्यावर”छत्रपती संभाजी नगर (मराठवाडा विभाग) व उत्तर महाराष्ट्र विभागाची” जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या उल्लेखनीय सामाजिक, …

Read More »

मस्तान शहा नगर येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिर 

हिंगोली,दि 10 ः प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) 10 वर्षपूर्ती निमित्त शहरातील आरोग्य केंद्र मस्तानशहा नगर येथे आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये तसेच तालुका आरोग्य अधिकारी …

Read More »

महावितरण अंतर्गत  भ्रष्टाचाराची  चौकशी करा,मा.आ.विजय भांबळे आक्रमक

परभणी,दि 09 जिंतूर-सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात सुरू असलेले अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे तसेच महावितरण अंतर्गत झालेल्या फिडर सेपरेशन व दुरुस्तीच्या कामांमधील प्रचंड भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी  मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी मंगळवा (दि.09)  अधीक्षक अभियंता, परभणी यांच्याकडे केली आहे. राज्यात उष्णतेची तीव्र लाट असताना आणि तापमान ४० ते ४३ अंश …

Read More »