जिंतूर, ता. 27 : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी संस्थेच्या वतीने थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील एका निराधार विधवा महिलेस उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व करडू भेट देण्यात आले. यासोबतच संबंधित कुटुंबास संसारोपयोगी भांडे साहित्य, जीवनावश्यक किराणा तसेच तीन अनाथ बालिकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. पार्श्वभूमी पतीच्या निधनानंतर अत्यंत बिकट …
Read More »महाराष्ट्र
भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद
जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह सर्व कामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 9 जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मात्र आठवडाभर मंदिर भाविकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, …
Read More »आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर नंतर पॅन कार्ड निष्क्रिय
मुंबई : जर तुमच्याकडं पॅन कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्राप्तिकर विभागानं सर्व पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन आधार कार्डाशी तात्काळ लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. आधार-पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर 2025 नंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. अनेक करदात्यांना अजूनही ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. लिंकिंग न केल्यास 1000 रुपयांचा दंड भरावा …
Read More »‘बीएसएनएल’ ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी….
जर तुमच्याकडे बीएसएनएल सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बीएसएनएलने अलीकडेच देशभरात 4G सेवा सुरू केल्या आहेत आणि आता 5G आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, बीएसएनएलने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएल 3G सेवा बंद करत असल्याची माहिती समोर येत आहेत. 5Gवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यासाठी तयारी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे. असे मानले …
Read More »नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
नांदेड : जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तर, या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस (Police) प्रशासनही चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी …
Read More »मोहंमद रफी यांच्या जयंती निमित्त सेलूत संगीत मैफिल ” शाम ए सरगम” तर्फे संगीतमय मानाचा मुजरा
सेलू ( प्रतिनिधी ) प्रसिद्ध गायक मोहंमद रफी यांच्या १०१ व्या जयंती निमित्त येथील सेवानिवृत्त संघ सेलू यांच्या वतीने संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते . दि २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सेवानिवृत्त संघाच्या पेन्शन भवन मधील विसावा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माजी अध्यक्ष गोविंदभाऊ जोशी हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून येथील उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक …
Read More »साने गुरुजींचा जीवन प्रवास म्हणजे “श्यामची आई” – मंजुषा बोराडे
सेलू / प्रतिनिधी – “श्यामची आई ” पुस्तक म्हणजे साने गुरुजींचा जीवन प्रवास असून मराठी साहित्यातील मैलाचा दगड असल्याचे विचार सहशिक्षिका मंजुषा बोराडे यांनी एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले . स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने साने गुरुजी यांच्या जयंती निमिताने आयोजित” एक दिवस एक पुस्तक” या उपक्रमात साने गुरुजी लिखित ” श्यामची आई ” या पुस्तकाच्या चर्चा कार्यक्रमाचे …
Read More »सेलूत माधवाश्रम स्वामी महाराजांचा ७६ वा पुण्यतिथी महोत्सव सुरू
सेलू / प्रतिनिधी – शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरात दि २४ डिसेंबर पासून परम पूज्य माधवाश्रम स्वामी महाराज यांच्या ७६ व्या पुण्यतिथी सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे . आज सकाळी प पू माधवाश्रम स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच स्थापीत देवतेचे व कलश पूजन मंदिर चे पुजारी केशवराव मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बालासाहेब खापरखुंटीकर ,सुधीर मंडलिक यांनी …
Read More »मोंढा येथे मराठा वधु वर परिचय पत्रिकेचे प्रकाशन
परभणी / प्रतिनिधी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या वधु वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन नवामोंढा परभणी येथे पंढरीनाथ घुले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. यावेळी वधु वर परिचय मेळावा ही काळाची गरज असून सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे अहवाल उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सभापती यांनी केले …
Read More »आदिवासी मंत्र्याच्या निषेधार्थ तहसीलवर महादेव कोळी समाजाचा निषेध मोर्चा
पूर्णा (सुशिल कुमार दळवी) : राज्याच्या अनुसूचित जमातीत समाविष्ट असलेल्या कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी, ढोर कोळी या जमातींच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दुजाभाव केल्याचा आरोप करत आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या वतीने दि.18 डिसेंबर रोजी पूर्णा तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले त्यावेळी तहसील कार्यालया समोर आदिवासी मंत्री डॉ. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com