04/02/26
Breaking News

महाराष्ट्र

कन्हेरवाडी शिवारात ४१ वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या

सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद सेलू (प्रतिनिधी) – तालुक्यातील वालूर येथील ४१ वर्षीय शेतकरी पांडुरंग आनंदराव शिंदे यांनी कन्हेरवाडी शिवारातील गट क्रमांक ७/१ मधील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबर दुपारी ते १५ नोव्हेंबर सकाळी दरम्यान घडली. ही बाब १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. मयताच्या भावाने दिलेल्या माहितीवरून सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद …

Read More »

सेलूत अक्षर साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन

ग्रंथदिंडीतील के बा विद्यालय व नूतन कन्या मधील मुलींच्या लेझीम पथकाने वेधले सर्वांचे लक्ष सेलू / प्रतिनिधी – येथील मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून पहिले अक्षर प्रतिष्ठान जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन रविवार १६नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.   यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थानी …

Read More »

अचानक लागलेल्या आगीत १५ एकर ऊस जळून खाक

-पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक शिवारातील घटना पाथरी / प्रतिनिधी – विद्युत वाहिनी तारांमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे १५ एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक शिवारात शनिवारी(दि. १५)सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.   या आगीत भारत गणेश घांडगे यांचा दोन एकर, रामेश्वर भानुदास वरकड यांचा दोन एकर दहा गुंठे, ज्ञानेश्वर वरकड यांचा अडीच एकर, सखाराम संतराम घांडगे …

Read More »

परभणीचा बालकलाकार विनायक कऱ्हाळे याचा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

परभणी / प्रतिनिधी – अनेक राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये आपली छाप पाडल्यानंतर वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक दिग्दर्शित मराठी चित्रपट ऊत – भावनांचा उद्रेक हा येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात परभणीचा बाल कलाकार विनायक कऱ्हाळे हा नायकाच्या बालपणीच्या भूमिकेत अभिनय करताना दिसणार आहे.त्याने शरणम ही भूमिका …

Read More »

सेलु येथे ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल

सेलू / प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 04 सेलु येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लोकप्रिय अधिकृत उमेदवार मंगलआत्या कथले व किशोर भांडवले यांचा उमेदवारी अर्ज आज शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रविंद्र बापु धर्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत भरण्यात आला यावेळी शिवसेना सेलु-जिंतुर विधानसभाप्रमुख तथा जि.प.गटनेते मा.श्री राम (नाना) पाटिल,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा सेलु कृषी उत्पन्न बाजार समितिचे माजी सभापति श्री रंजित तात्या गजमल,युवासेना …

Read More »

गजानन चव्हाणची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 रामप्रसाद ओझा गंगाखेड,दि 12  तालुक्यातील कोद्री येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी व कुस्तीपटू गजानन चव्हाण याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावत परभणी जिल्ह्याचा मान उंचावला आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गजाननचा सत्कार …

Read More »

गंगाखेडात तिसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल नाही

 रामप्रसाद ओझा गंगाखेड,दि 12 ः गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन तीन दिवस उलटले तरीही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले इच्छुक सध्या तिकीट मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर काहींना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात अडचणी येत आहेत. उमेदवारांकडून नोटरी शपथपत्र, विविध प्रमाणपत्रे आणि निवडणूक आयोगाच्या आवश्यक अटी पूर्ण करण्याचे काम सुरू असून, …

Read More »

विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यावर गुन्हा दाखल

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा विविध कारणासह माहेरहून दुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी करणाऱ्या विवाहितेच्या पतीसह सासू,सासर्‍यावर १० नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील आरती विनोद सोनपसारे वय २३ वर्षे या विवाहितेस तुला कामधंदा येत नाही, स्वयंपाक ही येत नाही, आम्हाला मुलगी …

Read More »

परभणी महापालीकेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर….वाचा सविस्तर

परभणी,दि.11 : आगामी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध प्रभागातील विविध प्रवर्गातील आरक्षण मंगळवारी (दि.11) सोडत पध्दतीने निश्‍चित करण्यात आले आहे. वसमत रस्त्यावरील बी. रघुनाथ सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या विशेष बैठकीत सोडत पध्दतीने अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरीकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण व महिला) तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठीचे आरक्षण क्रमशः निश्‍चित करण्यात आले. ते पुढील प्रमाणे …

Read More »

पुणे महापालिका प्रभाग निहाय आरक्षण..वाचा सविस्तर

प्रभाग क्रमांक १ कळस धानोरी अ अनुसूचित जाती महिला ब अनुसूचित जमाती क OBC महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळ अ अनुसूचित जाती महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३ विमान नगर लोहगाव अ OBC महिला ब OBC सर्वसाधारण क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोली अ अनुसूचित जाती …

Read More »