05/02/26
Breaking News

महाराष्ट्र

पुरात अडकलेल्या बळेगावच्या युवकाची अडिच तासानंतर सुटका

हिंगोली,दि 13 ः वसमत तालुक्यातील दारेफळ शिवारात पुलावर ओढ्याला आलेल्या पुरात अडकलेल्या बळेगाव येथील तरुणाची अडीच तासानंतर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. बळेगाव येथील संतोष लांडगे हे शुक्रवारी दिनांक 12 रोजी  रात्री जवळा बाजार येथून करंजी दारेफळ मार्गे ते गावाकडे निघाले असता आठ वाजेच्या सुमारास दारेफळ शिवारातील एका ओढ्यावरील पुलावर पुराचे पाणी आले होते. पुलाच्या अलीकडच्या बाजूला पाणी कमी असल्याने …

Read More »

ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही महिलांचे मृतदेह सापडले

हिंगोली,दि 13 (प्रतिनिधी)ः वसमत तालुक्यातील गुंडा येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही महिलांचे मृतदेह शनिवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास  सापडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी ता. 12 दुपारपासून धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आला असून या पावसाचा सर्वात जास्त फटका वसमत तालु्क्याला बसला आहे. या शिवाय हिंगोली, कळमनुरी तालुक्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वसमत तालुक्यात ग्रामीण …

Read More »

सणासुदीच्या काळात धावणार पुणे-लातूर विशेष रेल्वे

परभणी –  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पुणे ते लातूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दिवाळीसारख्या गर्दीच्या काळात त्यांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. ही रेल्वे पुणे (हडपसर) आणि लातूर (Pune Latur Special Train) दरम्यान …

Read More »

मिशन स्कॉलरशिप अंतर्गत परभणी जिल्ह्यात पाचवी सराव चाचणी

परभणी / प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनात परभणी जिल्ह्यामध्ये विविध वर्गांचा अध्ययनस्तर वस्तुनिष्ठरित्या उंचावण्यासाठी मिशन नववी / दहावी, मिशन स्कॉलरशिप, मिशन क्लास फर्स्ट हे उपक्रम राबविल्या जात आहेत. मिशन स्कॉलरशिप अंतर्गत परभणी जिल्ह्यात पाचवी सराव चाचणी घेण्यात आली.   या अंतर्गत मिशन स्कॉलरशिप मध्ये एन एम एम एस …

Read More »

गोहेगाव येथील शाळेवर विद्यार्थ्यांसोबत गावकऱ्यांचा देखील बहिष्कार

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील गोहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री धामनगावे जे ए सर व श्री बोरगांवकर जी आर सर यांची गोहेगाव शाळेतून अचानक बदली झाली व त्यांच्याजागी नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री दिवटे सर हे मनोरुग्ण आहेत व श्री भांडे सर हे मध्यपान करुन शाळेत आल्यामुळे त्यांचा विरोध करत शाळेवर विद्यार्थ्यासह सर्व गावकरी यांनी दि.09/09/2025 वार मंगळवार …

Read More »

15 सप्टेंबर पर्यंत धुवांधार पावसाचा इशारा

परभणी,दि 11 ः परभणी जिल्ह्यात  11 ते 15 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा इशारा  देण्यात आला आहे.हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.त्यानुसार प्रशासनाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.  

Read More »

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज ! ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला सुरुवात

मुंबई,दि 11 ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आजपासून ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात …

Read More »

कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी सचिव पदी बी एस टेंगसे यांची नियुक्ती

पाथरी / प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी चे सचिव बी जी लिपने हे नियत वयोमानाने दिनांक 31/05/2025 रोजी सेवानिवृत्त झाल्याने सचिव पद रिक्त होते. बाजार समितीचे सहाय्यक सचिव बी.एस. टेंगसे यांच्याकडे प्रभारी सचिव पदभार देण्यात आला होता बाजार समिती संचालक मंडळ सभा दि. 26/08/2025 च्या सभेत सचिव पदास मान्यतेबाबत चा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता त्यावरून मा. विकास …

Read More »

पुर्णा रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर वाढली अतिक्रमणे

केदार पाथरकर पूर्णा,दि 10  पूर्णा रेल्वे स्थानक परिसर नागरिकांसाठी अक्षरशः त्रासदायक ठरत असून, अतिक्रमण, अनधिकृत व्यवसाय, दारू व मांस विक्री यामुळे या परिसरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. स्टेशनच्या कंपाउंडलगत मुख्य गेटपासून अष्टभुजा देवीकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे जवळजवळ बंदच झाला असून दोन पदरी रस्ता आता फक्त पायी चालण्याइतकाच उरला आहे. रस्त्यावर उघडपणे मांस विक्री होत असून, दिवस-रात्र मद्यपींचा मुक्त संचार चालू …

Read More »

जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ :27 लाख रुपये उकळल्याचा ठपका

परभणी,दि.10(प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावरील धर्मापुरी फाट्यापासून ते धर्मापुरी पर्यंतच्या रस्ते कामात संबंधित एजन्सीधारकाने कोणत्याही कामाविना सुमारे 27 लाख रुपये उकळल्याचा ठपका राज्य गुणवत्ता निरिक्षक पथकाने ठेकेदारासह भ्रष्ट अभियंत्यांच्या साखळीवर ठेवला असून संबंधितांकडून 27 लाख रुपये वसूल करावेत, अशी शिफारससुध्दा केली आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत योजनेतून धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी या रस्ते कामाकरीता सुमारे 27 लाख रुपये मंजूर केल्यानंतर जिल्हा …

Read More »