हिंगोली,दि 01 ः हिंगोलीकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आधुनिक आणि पर्यावरणपूरक अशा ‘ई-शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, आज १ जून २०२६ रोजी हिंगोली आगारात या बसेसचे भव्य उद्घाटन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण २१ ई-बसेस मंजूर झाल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४ बसेस आगारात सुखरूप दाखल झाल्या आहेत. या आधुनिक ई-शिवाई बसचे लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल …
Read More »महाराष्ट्र
प्रशासकीय काळातील कारभारास बगल, यशवंत सेनेच्या पत्रकार परिषदेत आरोप–प्रत्यारोपांचा पाढा
गंगाखेड / प्रतिनिधी शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका अपेक्षित असताना, यशवंत सेनेच्या पत्रकार परिषदेत मात्र आरोप–प्रत्यारोप आणि तक्रारींचाच सूर अधिक ठळक राहिला. आज आमदार डॉ. रत्नाकर शेट्टी यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते ॲड. सय्यद अकबर, उपाध्यक्ष सत्यपाल साळवे यांच्यासह नगरसेवक व सभापती उपस्थित होते. १४ मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील मंजूर–नामंजूर ठरावांचे वाचन करताना कारभारात पारदर्शकता नसल्याचे, नगरसेवकांना …
Read More »मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित,परभणीची जागा….
राज्यात आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जवळपास निश्चित झाला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. विधानपरिषदेच्या एकूण 17 जागांवर महाविकास आघाडीत पूर्ण एकमत झाले आहे. 1 जून 2026 हा उमेदवारी अर्ज …
Read More »हिंगोलीत माणुसकीचा ‘अक्षय’ झरा: १५ वर्षांपासून अविरत सुरू आहे ‘अन्नछत्र सेवा’!
हिंगोली,दि 29 (प्रतिनिधी) ः “तहानलेल्यांना पाणी आणि गरजवंतांना कपडे” या संत शिरोमणी साईबाबांच्या पवित्र शिकवणीचा वारसा जपत, हिंगोली शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात ‘अक्षय साईपात्र अन्नछत्र सेवा’ मागील १५ वर्षांपासून एकही दिवस खंड पडू न देता अविरतपणे सुरू आहे. जात, पात, धर्म यापलीकडे जाऊन ‘सर्वधर्मसमभाव’ जपणाऱ्या या अन्नछत्राने हजारो गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार दिला आहे. या सेवायज्ञात …
Read More »श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एन.पी.टी.ई.एल (NPTEL) परीक्षेत उल्लेखनीय यश
परभणी,दि 29 ः शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जुलै–डिसेंबर २०२५ व जानेवारी–एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहॅन्स्ड लर्निंग (NPTEL) मध्ये श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या, विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण ६१ विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये यश मिळवत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. यामध्ये ०४ विद्यार्थी व प्राध्यापकांनी एलिट + सिल्व्हर, २० विद्यार्थ्यांनी एलिट तर ३७ …
Read More »परभणी पोलिसांची मोठी कारवाई; 116 गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवण्यात यश
परभणी, दि. 28 – परभणी जिल्हा पोलीस दलाने धडक कारवाई करत तब्बल 116 गोवंशीय जनावरांची सुटका करून त्यांना जीवदान दिले आहे. नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील नांदखेडा रोडवरील बायपासजवळील शेत परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही व्यक्तींनी ग्रीन शेड उभारून गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी त्यांना एकत्र केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नानलपेठ पोलीस …
Read More »वृक्ष तोडीची तात्काळ चौकशी करून कारवाई करा, सुनील माने यांची मागणी
हिंगोली,ता 28 – हिंगोली तालुक्यातील दाटेगाव डिग्रस कऱ्हाळे राहुरी बुद्रुक राहुरी खुर्द संतुक पिंपरी या परिसरामध्ये टाटा पावर या कंपनीमार्फत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाखाली बाराशे एकरवर झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीचे तात्काळ चौकशी करण्याची मागणी सुनील माने या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी करोड रुपये निधी देत असते. पण टाटा पावर या सौर ऊर्जा प्रकल्पाकडून बाराशे …
Read More »न्यायालयाचे आदेश डावलून शेतजमीन मोजणी विरुद्ध तक्रार
सेलू दि २८ ( प्रतिनिधी ) सर्व्हे नंबर मध्ये समाविष्ट सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन जमीन मोजणी करण्या बाबत तालूका सत्र न्यायालयाचे आदेश असताना ते डावलून तालूका भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी शेख व कटारे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मौजे डीग्रस (बु) ता. सेलू येथील गट क्रमांक ७६ मधिल शेत जमीन गैर मार्गाचा अवलंब करून मोजणी केल्या बाबतची तक्रार उपविभागीय अधिकारी सेलू यांच्या …
Read More »देऊळगाव गात येथील सिमेंट काँक्रीटचे रस्त्याचे उदघाटन
सेलू ( प्रतिनिधी ) देऊळगाव गात येथे सिमेंट रस्त्याची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती . शिवसेना पक्षाचे माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या प्रयत्नातून या कामाला गती मिळाली असून या रस्त्यांचे भूमिपूजन दि २५ मे गुरुवार रोजी सकाळी मा. आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते पार पडले . या रस्त्याच्या कामासाठी हनुमान गात यांनी पाठपुरावा केला होता. देऊळगाव गात येथील …
Read More »कळमनुरी मर्डर प्रकरणातील दोन फरार आरोपी जेरबंद वाशिम-अकोला महामार्गावर पाच तास नाकाबंदी
हिंगोली | प्रतिनिधी कळमनुरी शहरातील साईनगर परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या झालेल्या खळबळजनक प्रकरणातील फरार दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले आहे. वाशिम-अकोला महामार्गावर तब्बल पाच तास नाकाबंदी करून ही धडक कारवाई करण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 22 मे 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कळमनुरी येथील साईनगर परिसरातील खुल्या मैदानात एका युवकाची डोक्यात …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com