परभणी,दि 10 ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर (मोदीजींचा वाढदिवस) पासून सुरू होऊन २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पर्यंत राज्यभरात तसेच भाजपा परभणी महानगर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी भाजपा परभणी महानगरच्या वतीने सावली विश्रामगृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला मराठवाडा संघटन मंत्री …
Read More »महाराष्ट्र
सेलूत जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात निदर्शने
सेलू :-प्रतिनिधी जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती सेलूच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात महाराष्ट्र राज्य सरकारने आणलेल्या “जनसुरक्षा विधेयकाच्या” विरोधात तीव्र धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर,कॉ रामकृष्ण शेरे,कॉ रामेश्वर पौळ,मिलिंद सावंत,कॉ उद्धव पौल, कॉ. दत्तुसिंग ठाकूर,शेख रहीम,विनोद तरटे, रामेश्वर बहिरट,विठ्ठल काळबांडे,मंगलताई कथले, मुश्ताक रब्बानी,दिलावरभाई,किशोर भांडवले, इरफान लाला, वैभव वैद्य,कॉ घोरी साजिद …
Read More »विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा -करुणा कुलकर्णी
सेलू/प्रतिनिधी विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे.शिक्षक हा दुसरा पालक असतो.समाज व देश घडविणारी पिढी तयार करण्यात शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका असते.विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करत असतात.शिक्षकांचे अध्यापन किती प्रभावी व यशस्वी झाले याची पावती विद्यार्थ्यांच्या प्रगतीत असते म्हणूनच विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा आहेत असे प्रतिपादन शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना केले. व्यासपीठावर …
Read More »सेलूत दक्षलक्षण महोत्सव निमित्त शोभायात्रा
सेलू (प्रतिनिधी) : सेलूतील दिगंबर जैन समाजाच्या वतीने “दक्षलक्षण महोत्सव”निमित्त सोमवारी, ९ सब्टेबंर रोजी विविध धार्मीक प्रवचने, कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा पालखी मिरवणुकीत चिमुकल्यांसह, महिला, तरूण आणि सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेलू शहरातील जैन मंदिरापासून सकाळी साडेआठच्या सुमारास शोभायात्रा निघाली. सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. …
Read More »सोने खरेदीचं नियोजन करत असाल तर आधी वाचा…
येत्या काही दिवसांमध्ये सोने खरेदीचं नियोजन करत असाल तर तुम्हाला सोन्याच्या दरांबाबत माहिती असणं आवश्यक आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सोन्याच्या दरानं नवे उच्चांक गाठले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याचा दर 3900 रुपयांनी वाढला आहे. केवळ वायदे बाजाराच नाही तर देशांतर्गत सर्राफा बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याचे दर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले …
Read More »सौरभ जाधव जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मोठा प्रतिसाद
परभणी,दि 07 ः मरडसगाव ता. गंगाखेड येथे सौरभ जाधव चॅरिटेबल ट्रस्ट,केरवाडी व बळीराजा विदयालय, मरडसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सौरभ जाधव यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 4 सप्टेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून संस्थेचे सहसचिव प्राचार्य कामजी जाधव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव माणिक जाधव हे होते. प्रमुख पाहुणे गंगाधर कांबळे, परिक्षक नवनाथ जाधव, …
Read More »उमला नाईक तांडा पडेगाव येथे सर्व रोग निदान उपचार व शिबिर
परभणी,दि 07 ः गंगाखेड तालुक्यातील उमला नाईक तांडा पडेगाव येथे संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन व परभणी आय सी यु च्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित्त भव्य सर्व रोग निदान उपचार व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत देशमुख हे होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेश भुमरे,सूर्यकांत देशमुख, आकाश लोहट यांचा …
Read More »श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
पूर्णा : आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात पूर्णा येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उमाशंकर मिटकरी प्रा. राजेश पर्लेकर श्री अशोक कदम श्री गजानन भालेराव श्री कालिदास वैद्य यांची उपस्थिती होती. या वेळी प्रा. उमाकांत मिटकरी यांनी आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जीवन …
Read More »शिक्षकांचा गौरव करून ‘शिवा’ संघटनेने जपली सामाजिक बांधिलकी
सेलू (तालुका प्रतिनिधी) : शिक्षक दिनानिमित्त सेलू शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटना यांनी शिक्षक दिन निमीत्त शिक्षकांचा सन्मान करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली. शुक्रवारी सेलू येथील कामगार भवनात आयोजित कार्यक्रमात तब्बल ६५ शिक्षक-शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये वसमतचे किर्तनकार व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा शिवा राष्ट्रीय भुषण सोनबा शिराळे गुरूजी , …
Read More »बार्टीच्या रमाई संशोधन प्रकल्पासाठी सिध्दार्थ तलवारे यांची तज्ञ मार्गदर्शकपदी नियुक्ती
नांदेड – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे अर्थात बार्टीच्या त्याग मुर्ती माता रमाई यांच्या जीवनावर ऐतिहासिक संशोधन प्रकल्पासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा रमाईच्या जीवनावर मराठी साहित्यातील देशातील पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करणारे अभ्यासक सिध्दार्थ तलवारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बार्टीच्या महासंचालक यांनी नुकतेच तसे पत्र दिले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com