ज्या शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून मुदतवाढ देण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. …
Read More »महाराष्ट्र
काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन
परभणी, दि. 14 (प्रतिनिधी) परभणी व जिल्हा शहर काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार बाजार येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्यांना अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करण्यात आली.त्यांच्या …
Read More »वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा मराठवाड्यातील ४०० हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद.
परभणी,दि 14 ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट रोजी विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमात विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व …
Read More »रविवारी परभणीत नाद ज्योती त्रैमासिक संगीत सभा
परभणी,दि 14 (प्रतिनिधी)ः ज्ञानेश ध्रुपद संगीत व शिक्षण प्रसारक संस्था आणि परभणी शहर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने नाद ज्योती त्रैमासिक संगीत सभेचे रविवारी (दि.17) सायंकाळी 7 वाजता येथील बी.रघुनाथ सांस्कृतिक सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या त्रैमासिक संगीत सभेत पं.जितेंद्र अभिषेकी यांचे नातू श्री.अभेद शौनक अभिषेकी, मयंक व अभिराम परळीकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. यावेळी गीत इनामदार तबला, ॠतुराज …
Read More »आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा बहारदार सोहळा
पूर्णा प्रतिनिधी (सुशिलकुमार दळवी): गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरात समाजहिताचे अनेक उपक्रम राबवून वाढदिवसाचा सोहळा आगळा-वेगळा साजरा करण्यात आला.दि.१२ ऑगस्ट रोजी गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात रक्तदान, महिलांसाठी साडीवाटप आणि दिव्यांग मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन अशा तिन्ही उपक्रमांचा समावेश होता. सकाळी गुट्टे काका मित्र मंडळाच्या संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले …
Read More »आता अवघ्या काही तासात जमा होणार धनादेश
मोठ्या व्यवहारांसाठी चेक दिला जातो, काहींचे पगारही चेकद्वारे आजही काढले जातात. मग अशावेळी पैसे खात्यावर येण्यासाठी वाट पाहावी लागते. चेक देणारा आणि घेणाऱ्याची बँक एकच असेल तर एक दिवसात चेक क्लिअर होतो. मात्र एका बँकेतून दुसऱ्या बँकेत चेक जाणार असेल तर त्यासाठी एक दोन तीन पैकी कितीही दिवसांचा अवधी लागतो. मात्र आता ही सगळी कटकट संपणार आहे. तुमच्या खात्यावर अवघ्या …
Read More »परभणीच्या आर. पी. हॉस्पिटलच्या तत्परतेमुळे सात वर्षीय बालकाचे प्राण वाचले
परभणी,दि 14 ः परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाच्या समयसूचकतेमुळे आणि कुशलतेमुळे एका सात वर्षीय बालकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. एका सात फूट खोल गटारात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकावर तातडीने शस्त्रक्रिया करून त्याला नवे आयुष्य देण्यात आले. परभणी शहरात एका भागात एक सात वर्षीय बालक सात फूट खोल गटारात पडला. तब्बल तीन तास बेशुद्ध अवस्थेत गटारात …
Read More »विज्ञाननिष्ठ होणे काळाची गरज-एकनाथ जाधव
सेलू/प्रतिनिधी – विज्ञानाच्या शक्तीची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे,बालपणापासूनच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी .वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होतो त्यासाठी विज्ञाननिष्ठ होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांनी केले. अखिल भारतीय विज्ञान मेळावा अंतर्गत शिक्षण विभाग (पं.स.सेलू ) विवेकानंद प्राथमिक विद्यालय आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ( दि.१३ऑगस्ट,बुधवार) रोजी विवेकानंद विद्यालयात उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे ,गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण …
Read More »ध्येयप्राप्तीसाठी स्वतः मधील कौशल्य विकसित करा – डॉ.अंकित मंत्री यांचे प्रतिपादन
सेलूच्या नूतन विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार उत्साहात सेलू – जीवनात आईवडील आणि शिक्षक यांचे नि:स्वार्थ प्रेम लाभत असते. याची कायम जाणीव ठेवा, त्यांच्या भावना कधीही दुखवू नका. ध्येय प्राप्तीसाठी स्वतःमधील प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा आणि ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करा, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी तथा परभणी येथील प्रसिद्ध अतिदक्षता आणि भूलतज्ज्ञ डॉ.अंकित अशोककुमारजी मंत्री यांनी केले. सेलू येथील नूतन विद्यालयातील …
Read More »केमापूच्या शिक्षकांनी केला अवयवदानाचा संकल्प
सेलू / प्रतिनिधी – हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ता.१३ बुधवार रोजी जि.प.शाळा केमापूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या प्रेरणेने व तालुका आरोग्य अधिकारी कृष्णकुमार चौधरी,उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव दान पंधरवड्या निमित्त मुख्याध्यापक डॉ.शरद ठाकर यांनी उपस्थित ग्रामस्थांची अवयवदान विषयक गैरसमज व अवयवदान आजच्या काळाची गरज याविषयी जनजागृती केली. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com