16/10/26
Breaking News

जनाबाई जन्मभूमीत वारकरी सेवा-सत्कारासाठी गंगाखेड सज्ज

गंगाखेड प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा
गंगाखेड शहर हे वारकरी संप्रदायातील थोर संत कवयित्री जनाबाई यांच्या जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या व वैदर्भीय दिंड्यांचे गंगाखेड शहरात मोठ्या संख्येने आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर वारकरी सेवा व सत्कारासाठी गंगाखेडकर सज्ज झाले आहेत.
आषाढी वारी दरम्यान सुमारे ६५ हून अधिक दिंड्या गंगाखेड शहरात दर्शनासाठी मुक्कामी ६५ दिंडी व १५ हजार वारकरी मुक्कामी थांबत असून, ये-जा करणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शहरातील नागरिक, भक्तमंडळी व विविध सेवा संस्था पुढाकार घेत आहेत.
मुक्कामी थांबणाऱ्या दिंडीतील वारकरी बांधवांसाठी भोजन व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात येत असून, अनेक भक्त वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपात सेवा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
श्री राम मंदिर (झोपडी) येथे वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था बंडूशेठ कात्रे,प्रभु अप्पा दावलबाजे,ताराचंद नखत, विष्णू वलसेटवार,सुभाषमामु झवेरी सह शहरातील व्यापारी तरुण मंडळ यांच्या वतीने करण्यात येत असून, अनेक सेवाभावी गट या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
तसेच सवंगडी कट्याच्या माध्यमातून प्रकाश घण, डॅा.हेमंत मुंडे,डॅा.योगेश मल्लुरवार,प्रकाश घण,,नंदकिशोर सोमाणी,मकरंद चिनके,जगदीश तोतला,पुरुषोत्तम भंडारी,गजानन महाजन,कारभारी निरस,संदीप कोटलवार,ब्रिजेश गोरे,अक्षय जैन,मनोज नाव्हेकर.रमेश औसेकर. यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे मसाज, प्राथमिक औषधोपचार व पाणी सेवा दिली जात असून, यावर्षीही ही सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
याशिवाय संत मोतिराम महाराज सेवा समिती यांच्या तर्फे शहरातून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सकाळचा चहा व पाणी व्यवस्था मार्केट यार्ड जवळ मनोज झंवर,मनिष तापडिया,अरुण गादिया, मनमोहन मानधना,आनंद सारडा,अमित भंडारी,आनंद धोका , सचिन मुंदडा,प्रितेश भंडारी, राजेश मणियार, ठाकूर बाफणा, गणेश ओझा,यांच्या वतीने करण्यात येत आहे. नगर परिषद गंगाखेड यांच्या वतिने दिंडी मार्गावरील दिवाबत्ती, नालेसफाई, रस्त्यावरील डागडुजी फिरते शौचालय, शौचालय यांच्या देखरेक दुरुस्ती संबंधित नगराध्यक्षा प्रतिनिधी तथा गटनेते ॲड मिथिलेश केंद्रे यांनी न.प. आधीकारी सह दौरा करत आवश्यक सुचना करत जातीने लक्ष घालून आहे.
जनाबाई जन्मभूमीतून जाणाऱ्या वारकऱ्यांना सेवा करण्याचे भाग्य लाभावे, या भावनेतून गंगाखेड शहरात सेवेचे, भक्तीचे आणि समर्पणाचे वातावरण निर्माण झाले असून, वारकरी बांधवांकडूनही या सेवाभावाचे कौतुक करण्यात येत आहे.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …