16/10/26
Breaking News

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचे नागरिकांना आवाहन

सेलू ( प्रतिनिधी )
भविष्यात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे .असे आवाहन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले आहे .
एल निनो च्या पार्श्वभुमीवर हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे .
त्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लोअर दुधना प्रकल्पातील ३.९१ दलघमी पाणी सेलू शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे .सध्या शहरात नगर परिषदेच्या वतीने सहा जलकुंभाद्वारे दररोज ४५ लाख लिटर पाणी पुरवठा केला जात आहे .
सद्यस्थितीत प्रकल्पात २५.६५ टक्के जलसाठा आहे .गतवर्षी या महिन्यात हा साठा ३५.८६% होता .
आगामी काळात कमी पाऊस पडला तर एक वर्ष पुरेल एवढे पाणी प्रकल्पात आहे .
त्यासाठी नागरिकांनी भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा .
तसेच प्रत्येकाने आपल्या नळाला तोटी बसवून घ्यावी .पाणी भरणे झाल्यास गाडी धुणे ,नाली धुणे तसेच स्वछतागृहात पाणी सोडून देणे असे प्रकार टाळावेत .
व वेळेवर पाणी पट्टी भरून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे .असे आवाहन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले आहे .

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …