04/02/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

परभणीच्या विकासासाठी सदैव कटीबध्द-शिवाजी भरोसे यांची ग्वाही

परभणी,दि 23 ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध विकास कामे सुरु आहेत. परभणी शहरातील प्रभाग क्रं. ५ मध्ये भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नामुळे लोकमान्य नगर येथील मारोती मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. भारतीय जनसंघाचे जनक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करून विकासकामाचे भूमिपुजन जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

1500 रुपये कधी मिळणार….लाडक्या बहिणींचं लक्ष

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. योजना सुरु केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केले जायचे. या योजनेद्वारे आतापर्यंत लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. आता जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये …

Read More »

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केले महावितरण कार्यालयात भजन आंदोलन

परभणी,दि 23 ः शेतकऱ्यांनी पैसे भरूनही शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळत नसल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयात सोमवार दिनांक 23 जून रोजी भजन आंदोलन केले. शेतकऱ्यांना तात्काळ सौर पंप वितरित करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी संघटनेने यावेळी केली. शासनाच्या सौर कृषी पंप योजना अंतर्गत 25 टक्के रक्कम भरून अनेक शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज केले परंतु शेतकऱ्यांना मागील आठ …

Read More »

श्री शिवाजी पॉलीटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

परभणी,दि 23 ः महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात परभणी येथील म. शि. प्र. मंडळ श्री शिवाजी तंत्रनिकेतने घवघवीत यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात सिव्हिल विभागातील बनसोडे गौरी हिने महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवाल तर यात बुलबुले विठ्ठल 90.23%, …

Read More »

श्री शिवाजी विधी महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन

परभणी – भारत सरकारने ’एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग‘ या शीर्षकांतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५ साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे शनिवार २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या गुणवत्ता व हमी कक्ष आणि क्रीडा विभागच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   सर्वप्रथम शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

“भक्तीयोग २०२५ : प्रेम, योग आणि भक्तीची दिंडी”

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरीच्या वाटेवर भक्तिभावाने चालणाऱ्या वारकऱ्यांसोबत “भक्तीयोग २०२५” हा विशेष उपक्रम भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. “भक्तीयोग २०२५” हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे अत्यंत नियोजनबद्ध …

Read More »

अन्नत्याग आंदोलन यशस्वी:प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचा मटकऱ्हाळा येथे सत्कार

परभणी,दि 22 ः बच्चुभाऊ कडू यांच्या सोबत शेतकरी कर्जमाफी व इतर १७ मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होऊन स्वतः सात दिवस अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आज परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, सोनपेठ तालुका प्रमुख अशोक मस्के …

Read More »

श्री शिवाजी विधी महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन

परभणी,दि 22 ःः भारत सरकारने ’एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग‘ या शीर्षकांतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५ साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे शनिवार २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या गुणवत्ता व हमी कक्ष आणि क्रीडा विभागच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

आर.पी. हॉस्पिटलकडून दर अर्ध्या तासाला रुग्णांसाठी मोफत बस सेवा

परभणी,दि  22 परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने रुग्णसेवेच्या उद्देशाने आणि रुग्णांच्या गैरसोयी टाळण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. परभणी बस स्थानक ते आर.पी. हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी या मार्गावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला उपलब्ध असेल. अशी माहिती आमदार डॉ …

Read More »

टाकळी कुं. येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे आनंद भरोसे यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी (प्रतिनिधी): ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून ग्रामविकासाअंतर्गत अल्पसंख्याक निधी मूलभूत सुविधेसाठी परभणी विधानसभेतील मौजे टाकळी (कुं.) येथे मुख्य रस्त्याच्या कामासाठी २५ लक्ष निधी उपलब्ध करून त्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते करण्यात आले. टाकळी (कुं.) येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित होते. परंतु नागरीकांच्या मागणीनुसार येथील अनेक कामे आनंद भरोसे यांनी मार्गी लावली आहेत. याप्रसंगी …

Read More »

शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नांना यश : साडेगाव येथे १०० के.व्ही सुरु

परभणी : तालुक्यातील साडेगाव येथे भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नांतून १०० केव्ही डीपी बसवण्यास प्रशासनाने मंजुरी देऊन तात्काळ काम पूर्ण केले. त्यामुळे गावकऱ्यांना लाईट संदर्भात होणारी गैरसोय टळणार आहे,e असे भारतीय जनता पार्टीचे शिवाजी भरोसे यांनी सांगितले. साडेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने १०० के.व्ही. डीपीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती, यासाठी भारतीय जनता पार्टीचे शिवाजी भरोसे यांनी महावितरण …

Read More »

सेलूतील सर्व्हे न.१५७ ची जमीनीचा फेरफार रद्द

सेलू,दि 22 ः येथील सर्व्हे नंबर १५७, १५८व १६२ मधिल पदमसी जिनिंग ॲन्ड प्रेसिंग ला ९९ वर्षांच्या अटी व शर्तीवर दिलेल्या जमीनीची मुळ मालकी गोविंदराम दादूपंथी मठाचीच आहे त्यामुळे इतर दोन संचलकांनी सदरील जमीन हडपण्याच्या उद्देशाने स्वतःच्या नावे केलेले फेरफार उपविभीय महसुल अधिकारी संगीता सानप यांनी रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की येथील गोविंद …

Read More »

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर.. शून्य टक्के व्याजदराने मिळणार कर्ज

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या अटी आणि शर्तींच्या कचाट्यात अडकली आहे. निवडणूक काळात पडताळणी न करता सरसकट लाभ दिल्यानंतर आणि त्याचा अमाप बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडल्यानंतर सरकारने हळूहळू पडताळणी सुरू करून त्या माध्यमातून आधी पात्र असलेल्या लाडक्या बहि‍णींना नंतर अपात्र ठरवले. यामुळे लाडक्या बहिणींसह विरोधकांच्या मोठ्या टीकेला राज्य सरकारला सामोरे जावे लागले. मात्र यावर …

Read More »

वैद्यकीय उपचारांची गरज टाळण्यासाठी आरोग्याची काळजी महत्त्वाची-कुलगुरू डॉ इन्द्र मणि

परभणी,दि 21 ः योग हे भारताचे प्राचीन ज्ञान असून ते मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य व एकाग्रता वाढवते. योगामुळे तनावमुक्त जीवन, रोगप्रतिकारक शक्ती वाढ, आणि संतुलित जीवनशैली मिळते. असे प्रतिपादन  कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि केले. ते २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बोलत होते. हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने …

Read More »

विवेकानंद विद्यालयात योगदिन साजरा

सेलू/प्रतिनिधी शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन (२१जून ) उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्याच्या फायद्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या योगाचा जगभरात प्रसार होत आहे. योगसाधना मन व शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते.शारीरिक व मानसिक सुदृढता राखण्यासाठी योग उपयुक्त आहेत. वृषाली देशमुख व गजानन साळवे यांनी विद्यार्थ्यांना प्राणायामाचे महत्व सांगितले व प्रात्यक्षिक …

Read More »