17/07/26
Breaking News

हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

गुजरातमधील राजकोट येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, खेळत असताना १४ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू  झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आनंदी मोदी असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. पुरुषोत्तम मास आणि शाळेला सुट्टी असल्याने आनंदी आपल्या मामाच्या घरी राजकोट येथे आली होती.

शाळेच्या सुट्ट्यांमुळे आनंदी राजकोट येथील तिच्या मामाच्या घरी गेली होती. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवणारी आनंदी रविवारी संध्याकाळी एका रेस्टॉरंटमध्ये नातेवाईकांसह जेवण्यासाठी गेली होती. जेवण झाल्यानंतर ती इतर मुलांसोबत खेळत होती. काही वेळातच एक हसता-खेळता चेहरा कायमचा शांत होईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.

रविवारी रात्री आनंदी आपल्या कुटुंबीयांसोबत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. जेवण आटोपल्यानंतर इतर मुलांप्रमाणे तीही बाहेर खेळण्यासाठी गेली. खेळताना अचानक तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. सुरुवातीला उपस्थितांना हा किरकोळ प्रकार वाटला. मात्र, ती बेशुद्ध पडल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.घटनेची गंभीरता लक्षात घेत कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

वैद्यकीय तपासणीनंतर आनंदीचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एवढ्या कमी वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Check Also

कर्जमुक्तीबाबत महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे जाणून घेवूया

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers’ Loan Waiver Scheme 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ …