राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे योग्य पद्धतीने करण्यात यावे असेदेखील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. खरात जमीन प्रकरणाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने तपास करत असून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे चौकशी सुरू आहे.
Shabdraj www.shabdraj.com