पुर्णा(सुशिल दळवी)…. शहरात गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेल्या तीव्र कॅश टंचाईमुळे एटीएम सेवा जवळपास ठप्प झाली असून सामान्य नागरिक शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रोख रकमेचा पुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन व्यवहारांवर कमालीचा परिणाम झाला असून बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे.
शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) रिझर्व बँकेकडून रकमेचा पुरवठा केला जातो त्यानंतर ही रोकड इतर बँकांना वितरित केली जाते. मात्र मागील काही दिवसापासून मुख्य शाखेत रोकड उपलब्ध नसल्याने साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी शहरातील बहुतांश एटीएम केंद्रांवर नो कॅश चे फलक झळकत आहेत.
..लग्नसराई नागरिकांचे हाल..
सध्या लग्नसराईचा हंगामा जोमात सुरू आहे. त्यातच महिन्याचा पगार जमा होण्याची वेळ असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या फेऱ्या मारूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
..बाजारपेठेत मंदीचे सावट..
कॅश टंचाईचा सर्वाधिक फटका किरकोळ व्यापारी. भाजी विक्रेते आणि छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. ग्रामीण भागात आजही रोखीने व्यवहार करण्याकडे कल असल्याने बाजारपेठेतील गर्दी ओसरली आहे. डिजिटल पेमेंटच्या मर्यादा आणि सर्वच ठिकाणी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत….
प्रतिक्रिया:
… व्यापारी… शेतकरी, नागरिक यांना व्यवहारात रोख रक्कम अत्यावश्यक असते. बँकेतून पैसे मिळत नसल्याने ग्राहक यांना शेतकऱ्यांचे रोजच्या व्यवहारांवरही परिणाम होत आहे…
रामचंद्र भोसले,
कृष्णा अग्रो एजन्सी पुर्णा
.. प्रतिक्रिया…..
रिझर्व बँकेकडूनच पुरवठा कमी झाल्याने. अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही उपलब्धतेनुसार ग्राहकांना किमान रोकड देण्याचा प्रयत्न बँक स्तरावर सुरू आहे….
शिवाजी खुडे
शाखा व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुर्णा
Shabdraj www.shabdraj.com