16/10/26
Breaking News

आळंदी देहूतील अनेक पुल पाण्याखाली, वारकऱ्यांसाठी महत्त्वाचं आवाहन

पुणे : आषाढी वारी २०२६ मधील मानाच्या पालख्यांचे प्रस्थान अवघ्या काही तासांवर आले आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी देहू येथून पंढरपूरकडे होईल, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी आळंदी येथून होईल. तत्पूर्वी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आळंदी देहूतील अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू आळंदीला येऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे आवाहन धुडकावून लावत आम्ही देहू आळंदीला जाणारच, असा पवित्रा वारकऱ्यांनी घेतला आहे.

देहू आणि आळंदीला येऊ नका, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

मुंबई वेधशाळा हवामान अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात दिनांक ०६/०७/२०२६ रोजी रेड अलर्ट दिला असून त्याप्रमाणे देहू व आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे सदर परिसरातील पाणी साठा वाढला आहे. श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी प्रस्थान अनुक्रमे दिनांक ०७ आणि ०८ जुलै रोजी देहू आणि आळंदी येथून होणार आहे. तरी सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दी अथवा त्यापुढे पासून सहभागी व्हावे, असे जिल्हा प्रशासनाकडून सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. याबात सर्वांनी सयंम बाळगून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पुणे यांचे वतीने करण्यात येत आहे.

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …