Special Trains for Pandharpur Yatra
नांदेड – पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे नांदेड विभागासह मराठवाड्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.
विशेष रेल्वेगाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
गाडी क्रमांक 07631 नगरसुल–पंढरपूर विशेष
ही गाडी शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी नगरसुल येथून सायंकाळी ७.०० वाजता सुटेल. रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन आणि कुर्डुवाडी मार्गे शनिवार, २५ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 07632 पंढरपूर–जालना विशेष
ही गाडी शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथून रात्री ८.०० वाजता सुटेल. कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू आणि परतूर मार्गे रविवार, २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता जालना येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 07633 आदिलाबाद–पंढरपूर–मिरज विशेष
ही गाडी शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी आदिलाबाद येथून सकाळी ५.०० वाजता सुटेल. किनवट, बोधडी बुजुर्ग, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, हरंगुळ, धाराशिव, पांगरी, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी आणि मोडनिंब मार्गे शनिवार रात्री ९.४० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. त्यानंतर सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ आणि आरग मार्गे रात्री ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 07634 मिरज–पंढरपूर–आदिलाबाद विशेष
ही गाडी शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी मिरज येथून रात्री ९.३० वाजता सुटेल. आरग, कवठेमहांकाळ, जत रोड, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, हरंगुळ, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्रकुंड आणि किनवट मार्गे रविवार दुपारी ३.०० वाजता आदिलाबाद येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 07635 अकोला–पंढरपूर विशेष
ही गाडी शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी अकोला येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल. वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तापूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुर्डुवाडी आणि मोडनिंब मार्गे शनिवार सकाळी ९.२० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 07636 पंढरपूर–अकोला विशेष
ही गाडी शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल. मोडनिंब, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, चित्तापूर, सेरम, तांदूर, विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली आणि वाशिम मार्गे रविवार दुपारी ४.५० वाजता अकोला येथे पोहोचेल.
दक्षिण मध्य रेल्वेने भाविकांना प्रवासाचे नियोजन करताना या विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशी सेवा तसेच जवळच्या रेल्वे स्थानकाशी संपर्क साधावा, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
Shabdraj www.shabdraj.com