सेलू : (प्रतिनिधी) राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत कु. मुक्ता यादवराव घोडके हिने ९३.८० टक्के, कु. सृष्टी कैलासराव सोळंके हिने ९३.२० टक्के, तर ज्ञानराज जयंत बावणे याने ८९.४० टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. नूतन विद्यालयातील तब्बल २१ खेळाडूंनी राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी होत …
Read More »मराठवाडा
बळसोंड येथे जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
हिंगोली | प्रतिनिधी हिंगोलीजवळील बळसोंड ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. या योजनेचे उद्घाटन गावाचे सरपंच शैलेश जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. यासाठी सरपंच शैलेश जैस्वाल यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनस्तरावर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर …
Read More »ठेका वाळू उपसायचा दिला की गोदावरीचं कंबरडं मोडायचं?
गंगाखेड / प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू उपसण्याचा ठेका दिला म्हणजे काय—नदीची खुलेआम कत्तल करण्याचा परवाना दिलाय का? असा संतप्त सवाल आज गंगाखेड शहरातला सामान्य माणूस रस्त्यावर उभा राहून विचारतोय. ४, ६, ९ ब्रास भरलेले हायवा हजारो लिटर पाणी रस्त्यावर सांडत, धुराळा उडवत, सुसाट वेगानं धावतात… आणि प्रशासन गप्प! ठेका दिला म्हणजे नियम संपले का? किती लोड, …
Read More »जल जीवन व स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
परभणी, दि.७- जल जीवन मिशन (JJM) आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (SBM-G) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सध्या गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पगाराविना विकास कसा साध्य होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जल जीवन मिशन मधील कर्मचाऱ्यांचे सुमारे ५ ते ६ महिने, तर स्वच्छ भारत मिशन मधील कर्मचाऱ्यांचे …
Read More »दागीने सुरक्षीत ठेवा,हिंगोली पोलीसांचे आवाहन
हिंगोली,ता 07 सध्या लग्नसराईचा मोसम सुरू असून अनेक जण सुरक्षिततेच्या कारणास्तव बँक लॉकर मध्ये ठेवलेले दाग दागिने काढून आणतात व लग्न सोहळा संपल्यानंतर सुद्धा लगेच लॉकरमध्ये न ठेवता घरातील कपाटात सुरक्षित म्हणून ठेवतात परंतु हीच चूक नडते व घरात जेव्हा चोरी होते तेव्हा चोरट्याचे पहिले टार्गेट हे कपाट असते व सर्व दागिने लंपास होतात त्यामुळे आपण लाॅकर मधून काढून आणलेले …
Read More »मिसिंग लिंक महामार्गाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या-खा.रामराव वडकुते यांची मागणी
हिंगोली :- पुणे ते मुंबईदरम्यान सुरू असलेल्या मिसिंग लिंक महामार्गाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मंत्री अतूल सावे,आमदार गोपीचंद पडळकर आमदार तानाजी मुटकुळे, आमदार राहुल कुल,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ पंकज भिवटेस संजय कावडे, गोपाल सातपुते यांची उपस्थिती होती या मागणीमुळे …
Read More »एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा
हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ या महत्त्वाकांक्षी अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले असून, त्यानिमित्त जिल्ह्यात १ मे ते ८ मे या कालावधीत ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि जिल्हा शल्य चिकित्सक …
Read More »महात्मा फुले समता परिषदेच्या चित्ररथाचे हिंगोलीत जोरदार स्वागत
हिंगोली,दि 05 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्यावतीने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत आहे.या चित्ररथाचे हिंगोलीत सोमवारी आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध …
Read More »बारावीच्या गुणपत्रिकेत 3 मोठे बदल,आता आडनाव..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज शनिवारी २ मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालाच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, यंदा बोर्डाने निकालाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी गुणपत्रिका म्हणजे मार्कशीटमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. निकालाची …
Read More »कळमनुरीत अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई; शिवण लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त
कळमनुरी / प्रतिनिधी – शहरातील लमाण मंदिरासमोर अवैध वृक्षतोड करून शिवण प्रजातीचे लाकूड वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ कारवाई करत टेम्पो जप्त केला. जप्त करण्यात आलेला टाटा कंपनीचा टेम्पो (क्र. MH 16 Q 1288) विभागीय कार्यालयात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक सचीन माने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com