परभणी ता.27 भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यासाठी शनिवारी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते व महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन, धान्य व इतर साहित्य …
Read More »महाराष्ट्र
परभणीत हाहाकार..21 मंडळात ढगफुटी…..
परभणी दि.27 परभणी जिल्ह्यातील 21 महसूल मंडळात आज पहाटेपर्यंत अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.ही अतिवृष्टी नव्हे तर ढदफुटी आहे. संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सक्रिय आहे.विशेषतः पालम व गंगाखेड या दोन तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने अनेक नदी,नाल्यांना, ओढ्यांना, पूर आले आहेत. पुराच्या पाण्याने नदीवरील पूल पाण्याखाली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प आहे. शुक्रवारी सायंकाळपासून चा पाऊस शनिवारी …
Read More »शाश्वत विकास मानवासाठी उपकारक – प्राचार्य डॉ. बबन पवार
परभणी : येथील शारदा महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या अंतर्गत वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सचिन खडके यांची उपस्थिती होती तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अंजली शिंदे व प्रा. …
Read More »श्री शिवाजी विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त स्वच्छता अभियान.
परभणी,दि 25 ः श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांच्या उपस्थितीत युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशनुसार राज्यभरात “स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत सर्व नागरिकांना हाताची साखळी करून देशभरात आणि राज्यातही श्रमदान अंतर्गत “एक दिन, एक घंटा,एक साथ” हे एक तासाचे अभियान महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता करून यशस्वी पार पडले,हा संकल्प पार पाडण्यासाठी …
Read More »पाथरीत सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा
रमेश बिजुले पाथरी,दि 25 ः अंधापुरी, उमरा, गोंडगाव येथील गोदावरी नदी काठावरील पूरग्रस्त शेतकऱ्याचा नुकसानीचा पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करत सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संपूर्ण मराठवाड्यात सततच्या पावसामुळे तसेच जायकवाडी धरणाच्या वरील भागातील धरणातील पाणी जायकवाडी धरणात पाणी सोडल्यामुळे परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीला प्रचंड महापूर आलेला आहे. नैसर्गिक प्रवाह …
Read More »पाथरी तालुक्यात अनेक गावांमध्ये शिरले पाणी, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान
रमेश बिजुले पाथरी,दि 24 ः गेली दोन महिने सतत पाऊस पडत असल्याने शेतकरी, सामान्यजन मेटाकुटीला आलेला असतांना सोमवारी मराठवाड्यात सर्वदुर अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र पिकांचा चिखल झाला असतांना गोदावरी नदी काठावरील अनेक गावात घरात पाणी शिरून संसारोपयोगी, जीवनावश्यक वस्तूची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. छत्रपती संभाजीनगरहून दोन एनडीआरएफचे पथक बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी …
Read More »विद्यापीठासमोर प्रकल्पग्रस्तांनी सुरु केले आमरण उपोषण
परभणी,दि 24 (प्रतिनिधी)ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गट क जाहिरात प्रसिद्ध करून गट क च्या उमेदवारांच्या नियुक्त्या कराव्यात अशी मागणी करत प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने विद्यापीठाच्या कार्यालयासमोर बुधवार दिनांक 24 पासून अमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विविध संघटनांनी तसेच आमदार डॉ.राहुल पाटील यांनी देखील पाठिंबा दिला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांच्या भरतीसाठी शासनाने मंजुरी दिली परभणी वगळता …
Read More »सेलू तालूका सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा,कॉंग्रेस,माकपची मागणी
सेलू,दि 23 (प्रतिनिधी) तालुक्यात जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर 25 या तिन्ही महिन्यात सातत्य पूर्ण पाऊस मुसळ धार पडत आहे,तालुक्यातील मंडळ मध्ये अतिवृष्टी,पडझड,ढगफुटी,ढगाळ वातावरणा मुळे सोयाबीन,कापूस,तूर,मूग,उडीद इत्यादी खरीप पिकाची पुरती वाट लागली आहे नदी,नाले,ओढे व ओढे काठची करोडो टन माती व पिके वाहून गेली आहेत अतिवृष्टी मुळे घराची पडझड झाली आहे गुरे,ढोरे पशुधन वाहून गेले आहे तालुक्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालें आहे त्या मुळे …
Read More »पूर्णा येथे मोकाट गाढवांच्या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी
पूर्णा ता.२३ (प्रतिनिधी) पूर्णा शहरातील रस्त्यांवर मोकाट गाढवांचे दहशतवादी राज्य सुरूच आहे. सोमवारी (ता.२३) दुपारी मुख्य बाजारपेठेत पत्रकार अमृत कराळे यांच्यावर मोकाट गाढवांनी अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेने शहरातील नागरिकांचा संताप अनावर झाला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र सवाल उपस्थित होत आहेत. पुर्णा शहरात गेल्या काही महिन्यांपासून गाढव, गाय, वळू आणि कुत्र्यांनी रस्त्यांवर अक्षरशः मोकाट वचक निर्माण …
Read More »परभणी जिल्ह्यात गोदामाई कोपली..लष्कराची तुकडी, एसडीआरएफचे पथके जिल्ह्यात दाखल
परभणी, दि. 23 – जायकवाडी, माजलगाव या धरणांमधून परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत होणारा विसर्ग याशिवाय इतर प्रकल्पांतून जिल्ह्यातील विविध नद्यांमध्ये होणारा विसर्ग तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल, पोलीस, सैन्यदल, एसडीआरएफचे पथक ही सर्व यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, विशेषत: नदीकाठच्या गावांतील लोकांनी दक्षता घ्यावी. कुठलेही धाडस करु नका आणि अफवांवर विश्वास ठेवू …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com