मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र, जात पडताळणी समिती या मुद्द्यांवरुन राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली असून आज …
Read More »मराठवाडा
पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या
हिंगोली शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. २९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, आत्महत्या करताना संबंधित अधिकारी पोलिस गणवेशातच होते. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल गंगलवाड (वय ५०) असे या मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव …
Read More »परभणीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २ हजारांची लाच; बीएलओला एसीबीने रंगेहात पकडले
परभणी | प्रतिनिधी – मतदार यादीत कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करण्याच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास (बीएलओ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी परभणी शहरातील बालाजी भोजनालय, स्टेशन रोड परिसरात करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रेस नोटनुसार, रामेश्वर विलास काळे (वय ३७) हे सहायक शिक्षक असून प्रेरणा विद्यानिकेतन, वैभव …
Read More »मराठा महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले:नवनाथ वाघमारेंवर अखेर गुन्हा दाखल
‘ओबीसी नेत्यांची गोंडस मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या मुली त्यांच्या घरात घुसतात,’ असे अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान करणारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर अखेर जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विधानावरून राज्यभरात मराठा समाजातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या. वाढता दबाव आणि ठिकठिकाणी होणाऱ्या निदर्शनांनंतर वाघमारे यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत माफी मागितली आहे. नेमके …
Read More »ई बस मध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत सवलतीचा लाभ द्या,व्हाईस ऑफ मीडियाची मागणी,
परभणी, दि१७ अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मध्ये मोफत सवलत देण्याची मागणी व्हॉइस ऑफ मीडिया परभणी यांच्या वतीने विभाग नियंत्रक कार्यालय यांच्यामार्फत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या एसटी बस मध्ये आधीस्वीकृती धारक पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते, परंतु अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या …
Read More »टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?
हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि टोलेजंग इमारत अखेर पूर्णपणे तयार झाली आहे. आकर्षक बांधकाम आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असलेली ही इमारत सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, काम पूर्ण होऊनही ही वास्तू केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुलूपबंद असल्याने शहरातील वाचक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र निराशा पसरली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून …
Read More »गंगाखेडात चोरट्यांनी महिलेचे सोन्याचे गंठण पळवले
गंगाखेड प्रतिनिधी | रामप्रसाद ओझा शहरात पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, राजस्थान गल्ली परिसरातील एका महिलेवर सराफा बाजारात दुचाकीस्वारांनी हल्ला करून सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. राजस्थान गल्ली येथील रेश्मा बालाजी गुंडाळे या नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे चार …
Read More »व्यापार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल व्यापारी बांधवांचा गौरव
हिंगोली, दि 08 हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी बांधवांचा सत्कार व गौरव समारंभ शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी गणेश इन हॉटेल, हिंगोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा. आ. श्री. गजाननरावजी घुगे यांची मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंगोली …
Read More »चित्रकला भावनिक, सर्जनशील व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम-गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे
-नूतन विद्यालयात शासकीय बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली सेलू / प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित शासकीय बालचित्रकला स्पर्धा नूतन विद्यालय, सेलू येथे उत्साहात पार पडली. यावेळी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या भावनिक, सर्जनशील व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी, हस्तकौशल्य तसेच स्वतंत्र अभिव्यक्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी चित्रकलेतील विविध संधींचा …
Read More »गंगाखेडात ‘सेफ फूड’ अभियान कागदावरच; अन्न प्रशासनाचा ‘कानाडोळा’?
रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नाकडे अन्न व औषध प्रशासनाचे स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. राज्यभर ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती तसेच तपासणी व कारवाई केली जात असताना गंगाखेड शहर व तालुक्यात मात्र या अभियानाचा प्रभाव दिसतोय का? असा सवाल …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com