23/08/26
Breaking News

IIT ते COEP! महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणती?

Best Engineering / BTech Colleges in Maharashtra

लेखात आपण महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग शिक्षणासाठी आघाडीची महाविद्यालये जाणून घेऊयात.

१. IIT बॉम्बे (Indian Institute of Technology Bombay)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) ही इंजिनिअरिंग शिक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावरील संस्था आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक संशोधन सुविधा, उत्कृष्ट प्राध्यापक आणि देश-विदेशातील आघाडीच्या कंपन्यांमधील प्लेसमेंटमुळे ही संस्था विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरते. संस्थेने ‘एनआयआरएफ २०२५’ इंजिनिअरिंग रँकिंगमध्ये १०० पैकी ८३.६५ गुण मिळवत देशात तिसरे स्थान पटकावले आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम संस्था मानली जाते.

 

 

२. आयसीटी मुंबई (Institute of Chemical Technology)
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई ही विशेषतः केमिकल, फार्मास्युटिकल, फूड, पॉलिमर आणि बायोटेक्नॉलॉजी अभियांत्रिकीसाठी देशातील अग्रगण्य संस्था आहे. दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि उद्योगांशी असलेल्या मजबूत संबंधांमुळे येथील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळतात. या संस्थेला ‘एनआयआरएफ २०२५’ इंजिनिअरिंग रँकिंगमध्ये १०० पैकी ५७.९६ गुण मिळाले असून देशात ४१ वा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग शिक्षणासाठी ही दुसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम संस्था मानली जाते.

 

 

३. व्हीएनआयटी नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology)
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूर ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असून उत्कृष्ट शिक्षण, संशोधन आणि प्लेसमेंटसाठी ओळखली जाते. संगणक, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इतर अनेक शाखांमध्ये येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. ‘एनआयआरएफ २०२५’ इंजिनिअरिंग रँकिंगमध्ये या संस्थेला १०० पैकी ५६.५८ गुण मिळाले असून देशात ४४ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. इंजिनिअरिंगच्या दर्जेदार शिक्षणासाठी ही महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम संस्था आहे.

 

 

४. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI), मुंबई
वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI), मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी अभियांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण, अनुभवी प्राध्यापक, मजबूत माजी विद्यार्थी नेटवर्क आणि उत्कृष्ट प्लेसमेंटमुळे या संस्थेला मोठी मागणी आहे. ‘एनआयआरएफ २०२५’मध्ये VJTI ला १०१–१५० रँक बँडमध्ये स्थान मिळाले आहे. संगणक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीसाठी ही संस्था विशेष लोकप्रिय असून महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकावरील सर्वोत्तम इंजिनिअरिंग संस्था म्हणून ओळखली जाते.

 

 

५. सीओईपी पुणे (COEP Technological University)
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तंत्रज्ञान विद्यापीठ (COEP Technological University) हे इंजिनिअरिंग शिक्षणासाठी महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकावरील संस्था आहे. येथील दर्जेदार शिक्षण, अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा आणि उद्योगांशी असलेले मजबूत संबंध यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी मिळते. या संस्थेला ‘एनआयआरएफ २०२५’ इंजिनिअरिंग रँकिंगमध्ये १०० पैकी ४७.३१ गुण मिळाले असून देशात ९० वा क्रमांक प्राप्त झाला आहे. इंजिनिअरिंगच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकावरील सर्वोत्तम संस्था मानली जाते.


६. सिम्बायोसिस इंटरनॅशनल
पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल (Symbiosis International) ही संस्था इंजिनिअरिंग शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. ही संस्था ‘एनआयआरएफ रँकिंग’नुसार दर्जेदार शिक्षणासाठी महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. या संस्थेने ‘एनआयआरएफ’मध्ये १०० पैकी ५६.२२ गुण मिळवले आहेत. ही संस्था देशात ४६ व्या क्रमांकार आहे.

Check Also

‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी शाळा, फीस ऐकून व्हाल थक्क…

इन्स्टिट्यूट ले रोझी ही स्वित्झर्लंडमधील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जगातील सर्वात महागड्या बोर्डिंग शाळांपैकी एक …