14/07/26
Breaking News

विद्यर्थिनींनी प्रतिकार करण्यासाठी स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करावे-रितू श्रीवास्तव

सेलू / प्रतिनिधी – सध्या विद्यर्थिनींवर अत्याचाराच्या व छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे .त्यासाठी आपल्या सुरक्षिततेसाठी विद्यर्थिनींनी स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे .असे प्रतिपादन बोर्डीकर पोद्दार स्कुल च्या मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव यांनी एका कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना केले.

 

विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच संरक्षणाची भावना दृढ व्हावी या उद्देशाने पोद्दार स्कुल मध्ये कराटे ,तलवारबाजी व लाठी- काठी प्रशिक्षणाचे आयोजन सुरू करण्यात आले आहे .
येथील अनुभवी प्रशिक्षक पंकज सोनी हे या प्रशीक्षणात मार्गदर्शन करीत असून सहभागी विद्यार्थ्यांना कराटे ,तलवारबाजी तसेच लाठी काठी चे प्रगत कौशल्य प्रभावीपणे शिकवत आहेत .

 

यावेळी बोलतांना रितू श्रीवास्तव पुढे म्हणाल्या की ,विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मविश्वास वाढीसाठी असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे .यामधून विद्यार्थ्यांमध्ये धैर्य , शिस्त ,एकाग्रता ,आत्मविश्वास विकसित होऊन प्रसंगावधान ओळखून स्वसंरक्षणाची जाणीव नक्कीच वाढीस लागते . असेही त्यांनी यावेळी सांगितले .

 

या प्रशिक्षणास विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून पालकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले .

Check Also

हिंगोली जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत विभागप्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न!

​१६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाच्या नियोजनावर भर; मुख्य कार्यकारी अधिकारी …