21/07/26
Breaking News

राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, थेट मोदींच्या घराला घेरावा

नवी दिल्ली : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारच्या दारात आंदोलनाला बसलेले उद्याच्या भारताचे भविष्य अर्थात विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला केल्याप्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. मात्र चर्चेसाठी सरकारची परवानगी लागेल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगून चर्चा टाळल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यानंतर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षाचा पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला आहे.
दुपारी पावणे चार वाजल्यापासून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन धरले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते जयराम नरेश आदी नेते पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करीत आहेत. सरकारने त्यांच्या आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी धाडले.

नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाने निर्णायक वळण घेतले असून लाठीहल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीही जंतर मंतरवर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील देशभरातील विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलन विद्यार्थ्यांनी घेतला आहे. याच विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याकरिता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तसेच इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. गेल्या सव्वा दोन तासांपासून हे आंदोलन सुरू आहे.

 

 

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांच्या मागण्या मंत्री जितेंद्र सिंह यांनी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी, तसेच या चर्चेप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावे आणि प्रश्नांची उत्तरे द्यावीत, दुसरीकडे संसदेत चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहसचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावे, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशा मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत, असे राहुल गांधी यांनी जितेंद्र सिंह यांना सांगितले.

Check Also

शिवसेनेच्या 6 खासदारांचा पक्षप्रवेश अडचणीत? अरविंद सावंतांचा लेटरबॉम्ब, अपात्रतेची शक्यता

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षाच्या सहा खासदारांना पाठवलेल्या …