07/11/26
Breaking News

Shabdraj

समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जाळ्यात

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या रोड रॉबरी प्रकरणात बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील किरण अजिनाथ गायकवाड याचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी काल रात्री त्याला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्ग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. यात किरण गायकवाडचा किती गुन्हा मध्ये सहभाग आहे त्याच्यासोबत कोण कोण साथीदार आहेत याचा तपास …

Read More »

1 सप्टेंबरपासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल

१ सप्टेंबरपासून एलपीजीचे अनेक नियम बदलणार आहेत. सरकारने लागू केलेल्या नियमांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल. जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींसह अनेक घटकांचा एलपीजीच्या किमतींवर प्रभाव पडेल. याव्यतिरिक्त, गॅसवरील जीएसटी आणि इतर खर्चांचाही परिणाम होऊ शकतो. एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत मूळतः २३ ऑगस्ट होती, परंतु ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक अहवालानुसार, लाखो ग्राहकांनी अद्याप …

Read More »

12 तारखेपर्यंत मुंबईत जा,पण…..मनोज जरांगे यांनी सांगीतली आंदोलनाची दिशा

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. “आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसांनी नेलं तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील बोलले. मुंबईत कसं जायचं, कुठे रहायचं त्याचा प्लानही त्यांनी सांगितला. “मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख …

Read More »

अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार

मराठा आरक्षण  आणि कुणबी प्रमाणपत्र, जात पडताळणी समिती या मुद्द्यांवरुन राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळवणी समितीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, जरांगे पाटलांनी  उपोषणाला सुरुवात केली असून आज …

Read More »

पोलिस उपनिरीक्षकाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

हिंगोली शहरात एका पोलिस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. २९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, आत्महत्या करताना संबंधित अधिकारी पोलिस गणवेशातच होते. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. अमोल गंगलवाड (वय ५०) असे या मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव …

Read More »

सप्टेंबरमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसह होणार मोठे पाच बदल

ऑगस्ट महिना जवळ जवळ संपत आला आहे आणि सप्टेंबरच्या सुरुवातीबरोबरच अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. हे बदल खर्चापासून ते बचतीपर्यंत, प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करू शकतात. बँकिंग, गॅस सिलिंडर, कर, क्रेडिट कार्ड, प्रवास आणि इतर महत्त्वाच्या नियमांमधील बदलांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. अनेक बदलांमुळे जास्त पैसे भरावे लागू शकतात, तर काही बदलांमुळे दिलासा मिळू शकतो. त्यामुळे, सप्टेंबर सुरू होण्यापूर्वी या …

Read More »

शिंदे गटाची धाकधूक वाढली? सुप्रीम कोर्टाचा सवाल; एकनाथ शिंदेंसह आमदारांना अपात्र ठरवता येईल का?

नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे पुन्हा निर्णायक वळण मिळाले आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर बुधवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या एका महत्त्वपूर्ण प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रता नाकारण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला, तर एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांना न्यायालय स्वतः …

Read More »

परभणीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २ हजारांची लाच; बीएलओला एसीबीने रंगेहात पकडले

परभणी | प्रतिनिधी – मतदार यादीत कुटुंबातील सदस्यांची नावे समाविष्ट करण्याच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास (बीएलओ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी परभणी शहरातील बालाजी भोजनालय, स्टेशन रोड परिसरात करण्यात आली.     लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रेस नोटनुसार, रामेश्वर विलास काळे (वय ३७) हे सहायक शिक्षक असून प्रेरणा विद्यानिकेतन, वैभव …

Read More »

मराठा महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले:नवनाथ वाघमारेंवर अखेर गुन्हा दाखल

‘ओबीसी नेत्यांची गोंडस मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या मुली त्यांच्या घरात घुसतात,’ असे अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान करणारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर अखेर जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विधानावरून राज्यभरात मराठा समाजातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या. वाढता दबाव आणि ठिकठिकाणी होणाऱ्या निदर्शनांनंतर वाघमारे यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत माफी मागितली आहे. नेमके …

Read More »

भाजपच्या केंद्रीय संघटनेत महाराष्ट्रातून तीन नेत्यांना मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नव्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय संघटनेत महाराष्ट्राला यावेळी महत्त्वाचे स्थान मिळाले असून, अनेक नेत्यांवर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. नव्या नियुक्त्यांमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत …

Read More »