07/11/26
Breaking News

Shabdraj

सोन्याच्या दरात घसरण,चांदीच्या किमतीत…..

सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, 15 सप्टेंबर रोजी देशातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचा भाव  500 रुपयांनी कमी होऊन 1,55,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. दुसरीकडे, चांदीचा दर 2,34,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी चांदीच्या दरात घट …

Read More »

2000 पर्यंत UPI पेमेंटवर कोणतेही शुल्क नाही,केंद्र शासनाची माहीती

अर्थ मंत्रालयाने सोमवारी यूपीआय (UPI) पेमेंट्सबाबतची भूमिका स्पष्ट केली. सरकारने स्पष्ट केले की, बँका किंवा पेमेंट प्रणाली पुरवठादार २,००० रुपयांपर्यंतच्या यूपीआय पेमेंट्सवर कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क आकारू शकत नाहीत. रुपे (RuPay) डेबिट कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंट्सचाही यात समावेश करण्यात आला आहे. यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाण्याबाबतच्या चर्चा जोर धरत असतानाच हे स्पष्टीकरण आले आहे. वास्तविक, संसदेने ऑगस्ट महिन्यात ‘कर …

Read More »

गंगाखेडला स्वतंत्र वाहतूक पोलीस कार्यालय देऊ! शांतता समितीच्या बैठकीत वाहतूक कोंडी-अतिक्रमणावरून चर्चा; आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीने राजकीय रंग

गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनासह शहरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला. व्यापारी महासंघ, व्यापारी, लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील व शांतता समिती सदस्यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.   शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता स्वतंत्र वाहतूक पोलीस कार्यालय देण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक कुमावत यांनी दिले, तसेच …

Read More »

धनगर एसटी आरक्षणासाठी १७ सप्टेंबरला परभणीत धडकणार ‘महामोर्चा’; शशिकांत वडकुते यांचे हिंगोलीतून आवाहन

​हिंगोली / विशेष प्रतिनिधी – धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू केलेल्या मुक्तिसंग्राम लढ्याला १७ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून शासनाला वचनाची आठवण करून देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी येथे भव्य ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्च्यात हिंगोली जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी ताकतीने सहभागी व्हावे, असे आवाहन धनगर समाजाचे युवक …

Read More »

तब्बल ४४ मेंढ्यांचा अचानक मृत्यू

जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल ४४ मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे  मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान घटनेची माहिती कळताच पशुसंवर्धन  विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृत पडलेल्या …

Read More »

एकदा लाट उसळली तर दिल्लीकडे जाऊ शकतो- मनोज जरांगे पाटील

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 10 वा दिवस असून राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य न केल्याने उपोषण सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता, मी त्यांच्याशी फोनवरुन बोललो. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर हा फोन आला होते, तेव्हा या जीआरनुसार एकही मराठा …

Read More »

समृद्धी महामार्गावर नेमकी चोरी का होतेय?

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ सध्या भयंकर दहशतीखाली आला आहे. अपघातांचं सत्र संपत नाही तोच आता समृद्धी महामार्ग कुख्यात दरोडेखोरांचा सुरक्षित अड्डा झाला आहे. एकाच रात्री सिन्नर आणि शिर्डी दरम्यान चक्क 4 गाड्यांवर हॉलिवूड सिनेमाला लाजवेल अशा पद्धतीनं दरोडा टाकून प्रवाशांना बेदम मारहाण करत लाखो रुपयांचं सोनं आणि रोकड लुटण्यात आली. 100 च्या सुसाट वेगानं …

Read More »

14 हजार 234 ग्रामपंचायती प्रशासकाविना:ग्रामपंचायतींचा कारभार रामभरोसे

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत 23 ऑगस्ट रोजी संपली. मात्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने यासंदर्भात कसलाही आदेश काढला नसल्याने प्रशासनदेखील हतबल झाले असून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना शासन निर्णय येईना…प्रशासन निर्णय घेईना अशी म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील 27 हजार 968 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 रोजी संपल्यानंतर सरपंच परिषद व इतर सरपंच संघटनांनी प्रशासक म्हणून विद्यमान …

Read More »

ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन होणार बंद ….

परभणी, दि. ३ (- सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत विशेष मोहीम राबवली जात आहे. मोहिमेअंतर्गत परभणी तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील (PHM) रेशनकार्डवर नौद असलेल्या प्रत्येक सदस्याची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत …

Read More »

एनसीएमसी कार्डच्या रिचार्जच्या नावाखाली भलतीच लुट

राज्याची लाईफलाइन असलेल्या एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरातील तिकिट दिले जात नाही. प्रवाशांना थेट पूर्ण रक्कम देऊन तिकीट घ्यावे लागत आहे. त्यामुळे एसटी चालक आणि प्रवाशांमध्ये खटके उडत आहेत. आता, एनसीएमसी कार्डबाबत आणखी बातमी समोर आली आहे. प्रवशांनी १०० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना पूर्ण पैसे …

Read More »