09/05/26
Breaking News

Shabdraj

स्टोव्ह काढा बाहेर…… शिधापत्रिका धारकांना मिळणार 3 लिटर केरोसीन

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सामना देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून गॅसटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली असून व्यावसायिक गॅस पुरवठाही (Gas) बंद करण्यात आला आहे. त्यातच, आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं असून केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीनच्या वाटपास राज्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे, गॅस आल्यानंत कुठेतरी …

Read More »

संघर्षातूनच खरे जीवन फुलते-डॉ. स्मिता देऊळगावकर

सेलू( प्रतिनिधी ) आशा आपराद लिखित ‘ भोगिले जे दुःख त्याला ‘ या आत्मचरित्रात लेखिकेने सहन केलेले दुःख, अन्याय, अत्याचार यांचे वास्तववादी चित्रण केले आहे. संघर्ष हेच जीवन आहे. पण, संघर्षातून मृत्यू येत नाही तर जीवन फुलते. आपले जीवन बदलायचे असेल तर शिक्षण हिच उज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. हेच ‘ भोगिले जे दुःख त्याला’ या आत्मचरित्रातून शिकायला भेटते. असे प्रतिपादन …

Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी आला..थेट खात्यावर जमा

मुंबई, दि. २५ : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले. विधान भवन, मुंबई येथे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व …

Read More »

लाडक्या बहिणींना दिलासा, फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात

राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. अखेर या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय विभागाने यासाठी 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. महिला व बालविकास …

Read More »

सेलूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सेलू ( प्रतिनिधी ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ( दि. २३ ) रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या नियोजन बैठकीस परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी भेट देऊन सुसंवाद साधला. या प्रसंगी सेलूचे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांची उपस्थिती होती. बैठकीत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि …

Read More »

अजितदादांचा पायलट का बदलला? 57 दिवसांनी सत्य समोर

मुंबई : अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्या विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप केल्याने मोठी खळबळल उडाली होती. विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. अखेर 57 दिवसांनी फडणवीसांनी स्वत: …

Read More »

अजितदादांच्या विमान अपघातबद्दल मुख्यमंत्र्यांचा नवा खुलासा

मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अजूनही काही प्रश्न कायम आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अपघात प्रकरणावर सविस्तर निवेदन दिलं आहे. यावेळी त्यांनी बारामती विमानतळाच्या धावपट्टीबद्दल पहिल्यांदाच अहवालात काय नमूद केलं होतं, याची माहिती दिली. ही धावपट्टी पूर्णपणे  अनकंट्रोल एअर फिल्ड असणारी आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. अजित पवार विमान अपघात …

Read More »

‘पटेल-तटकरेंना NCP चा ताबा घ्यायचा होता, सगळं आधीच ठरलेलं’, थेट पत्र दाखवत रोहित पवारांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार  यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत खळबळजनक दावे आणि आरोप केले आहेत. रोहित पवारांनी म्हटलंय की, अजित पवारांच्या निधनानंतर (२८ जानेवारी २०२६) अवघ्या १८ व्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रफुल पटेल , सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले …

Read More »

पॅन कार्ड बनवणे आता होणार कठीण! १ एप्रिल २०२६ पासून नियम बदलणार;

देशात पॅन कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम लागू होणार असून, आता फक्त आधार कार्डच्या आधारावर पॅन कार्ड बनवता येणार नाही. त्यासाठी जन्मतारीख (DOB) सिद्ध करणारा वेगळा दस्तऐवज देणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या काय नियम आहेत?  आत्तापर्यंत पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड पुरेसं मानलं जात होतं. ई-केवायसी प्रक्रियेमुळे फोटो, सही आणि इतर माहिती थेट …

Read More »

गॅसचा तुटवडा संपला, राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, 20 टक्के…

इराण आणि इस्रायल युद्धामुळे जगात उर्जासंकट निर्माण झाले आहे. पश्चिमी देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधनाने भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली आहे. यामुळे भारतात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे दुसरीकडे नैसर्गिक वायुचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रही चांगलाच होरपळतोय. लोकांनी गॅस बुकिंग करूनही वेळेवर गॅस मिळत नाहीये. दुसरीकडे व्यावसायिक …

Read More »