महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी बारामती येथे त्यांचे विमान कोसळले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. अजित पवार पंचायत निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात होते. महाराष्ट्र हवाई वाहतूक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगसाठी बारामती विमानतळाजवळ …
Read More »Shabdraj
परभणीत भाजप उमेदवाराचा अवघ्या 1 मताने पराभव,प्रकरण कोर्टात
परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराविरोधात केवळ एका मताने पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवाराने आता कोर्टात धाव घेतली आहे. परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे व्यकंट डहाळे हे केवळ एका मताने विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या प्रसाद नागरे यांचा पराभव केला होता. या निकालावरून तेव्हा तीन तास गोंधळ सुरू होता. सर्व बाजू तपासल्यानंतर निवडणुक निर्णय …
Read More »विद्यार्थ्यासाठी मोठी बातमी.. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबवणार
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (27 जानेवारी) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबविण्यात येणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार.पीएम सेतू Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded …
Read More »सेलूत देशभक्तीपर गीतांनी जागवल्या स्वातंत्र्याच्या आठवणी
नारायण पाटील सेलू,दि 27 ः प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सेलूत प्रथमच जिल्हा पोलीस प्रशासन ,परभणी व स्वरयात्री म्युझिकल ग्रुप ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” ए मेरे वतन के लोगो ” या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात गायिलेल्या जोशपूर्ण गीतांनी स्वातंऱ्याच्या आठवणी जागवल्या गेल्या . येथील महेशनगर मधील नगरपरिषदेच्या साई नाट्यगृहात दि २६ जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून सेलूचे पोलीस …
Read More »जयश्री दूध एजन्सी जळून खाक; २५ लाखांचा फटका, शॉर्टसर्किटचा संशय
गंगाखेड / रामप्रसाद ओझा – गंगाखेड शहरात शनिवारी (दि. २४) मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास जयश्री दूध एजन्सीला भीषण आग लागून सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची खळबळजनक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत एजन्सीतील फ्रीज, डीप फ्रीझर, विद्युत उपकरणे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पाव, खारी, टोस्ट तसेच अन्य महत्त्वाचे साहित्य पूर्णतः जळून …
Read More »राज्यराणी एक्स्प्रेसच्या ए.सी. डब्यात प्रवासी दाम्पत्याची लूट
७० हजारांचा मुद्देमाल लंपास; पुर्णा रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा कुचकामी लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल पुर्णा / सुशील कुमार दळवी – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, मोठे दावे आणि गाजावाजा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. मुंबई–नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित (ए.सी.) डब्यात थेट चोरीचा प्रकार घडूनही रेल्वे सुरक्षा बल (RPF) व लोहमार्ग पोलिसांना चोरट्यांचा मागमूस लागू …
Read More »कै. स. गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
पाथरी / प्रतिनिधी – पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, मानवत संचलित कै. स. गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवनांद्रा (ता. पाथरी) येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दि. 23 जानेवारी 2026 रोजी प्रभावती विद्यालय, परभणी येथे पार पडलेल्या 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील विद्यार्थी चि. अधिराज सुधाकर फुलपगार व चि. यशराज रघुनाथ ताठे यांनी …
Read More »गोवंश हत्याबंदी प्रकरणी कार्यवाही केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
व्यंकटेश्वर प्रतिष्ठानचा उपक्रम सेलू / प्रतिनिधी – केंद्रात व राज्यात सर्वत्र गोवंश हत्या बंदी असतांना देखील सेलूत एका कत्तलखान्यात राजरोसपणे गोवंश हत्या चालू असल्याची खबर मिळताच सेलू पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दीपक बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कत्तलखान्यावर धाड टाकून धडक कार्यवाही केली. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता त्यांनी कत्तलखान्यावर धाड टाकून तिन गोवंशाचे मांस व 13 गाईंची …
Read More »पुणे महापालिका निवडणूक: वासंती जाधव यांचा ऐतिहासिक विजय
विजयी महिला उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळवून रचला विक्रम पुणे – पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग ३१ (मयूर कॉलनी – कोथरुड) मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वासंती नवनाथ जाधव यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. वासंती जाधव यांनी केवळ प्रतिस्पर्ध्यांचा पराभवच केला नाही, तर पुणे महापालिकेच्या निवडून आलेल्या महिला उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळवण्याचा मानही मिळवला आहे. ७२ टक्क्यांहून अधिक मतदारांची पसंती निवडणूक …
Read More »मराठवाड्याचा “वर्ल्डकप “ओळख असलेल्या “नितीन चषक” क्रिकेट स्पर्धेचे शानदार उदघाटन
ओम चैतन्य प पु श्री रामेश्र्वरजी महाराज यांची उपस्थिती सेलू / प्रतिनिधी – शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त येथील नितीन कला ,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आयोजित “नितीन चषक ” क्रिकेट स्पर्धेचा शानदार उदघाटन सोहळा आज मोट्या थाटात संपन्न झाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धाचे हे २६ वे वर्ष आहे . मराठवाड्याचा …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com