24/03/26
Breaking News

Shabdraj

कुपटा,वालुर येथे समाधान शिबिराचे आयोजन

सेलू दि ०६(प्रतिनिधी.) महसूल विभागाशी संबंधीत सेवा तळागळातील लोकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेले आहेत. सदरील सुधारणाचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विदयार्थ्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी विशेष जनजागृती व प्रसार अभियान तीव्र स्वरुपात राबविण्यात येणार आहे. त्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान टप्पा 1 अंतर्गत दिनांक ०७ मार्च रोजी वालुर महसूल मंडळामध्ये दुर्गादेवी बाजार …

Read More »

काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं…अनेक मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. या अर्थसंल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शेतकरी, विद्यार्थी, महिला, नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सर्व जण या अर्थसंकल्पाची वाट पाहत होते. काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. अखेर आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काय …

Read More »

डॉ.अमित कुलकर्णी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सेलू (प्रतिनिधी ) येथील नूतन महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्रज विभागाचे कर्तव्यदक्ष व अभ्यासू सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित दिलीपराव कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६” बहाल करण्यात येणार आहे. हा मानाचा पुरस्कारSwiftNLift Media And Tech LLP यांच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. दि. ७ मार्च २०२६ रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या या समारंभात महाराष्ट्र राज्याचे शालेय …

Read More »

सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी

सेलू दि ५ ( नारायण पाटील ) शहरात अलंकापुरी नगरी, मयुरी पार्क परिसर, सातोना रोड येथे ११ मार्च ते १९ मार्च या कालावधीत होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पारायण सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात रोज २५००० वाचक पारायण करतील. भोजनासाठी वेगळा मंडप केला असून एकावेळी ३००० हजार भाविक प्रसादाचा …

Read More »

सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक,आजचे नवे दर…

नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरु होती. आज सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. 5 मार्चला 24 कॅरेट सोन्याचे दर 2698 रुपयांनी कमी होऊन 159850 रुपयांवर आले आहेत. तर, सराफा बाजारात सोने उच्चांकाच्या तुलनेत 16271 रुपये स्वस्त आहे. सोन्याचा दर 176121 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जीएसटीसह …

Read More »

अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनी आणि तपास करणाऱ्या संस्थेवर काही प्रश्न उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेचा आज तिसरा भाग होता. याआधी रोहित पवार यांनी १० आणि १९ फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. आज मुंबईत तिसरी पत्रकार परिषद झाली. ज्यामध्ये रोहित पवार यांनी …

Read More »

रामराव वडकुते यांना भाजपाकडून राज्यसभेची लॉटरी 

परभणी,दि माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांना भाजपाकडून राज्यसभेची लॉटरी  आहे.त्यांना राज्यसभेची उमदेवारी जाहीर झाली आहे.उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या परभणीतील कल्याण नगरातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माजी विधान परिषदेचे सदस्य वडकुते हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. यापुर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास महामंडळावर …

Read More »

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला

: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे, तर इराण सतत प्रत्युत्तरादाखल हल्ले करत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने दावा केला आहे की, तेल अवीवमधील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे कार्यालय आणि इस्रायली हवाई दलाच्या कमांडरच्या तळाला लक्ष्य करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर नेतन्याहू यांची प्रकृती खालावली असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायली नेतृत्व हादरले आहे आणि आयआरजीसीचा दावा आहे की नेतन्याहू यांनीही …

Read More »

मराठवाड्यातील एक खासदार दुबईत अडकले..संपर्क तुटला

शनिवारी इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराण देशावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनेई ठार झाला. या घटनेनंतर आता इराण चवथळला आहे. इराणने अनेक आखाती राष्ट्रांवर हल्ला चढवला आहे. संबंधित देशातील अमेरिकेच्या सैनिकी स्थळांना इराणकडून टार्गेट केलं जात आहे. यामुळे संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला असून अनेक भारतीय आखाती …

Read More »

युध्दाचा परिणाम, पेट्रोल-डिझेल महागणार?

आखाती देशांमधील वाढत्या तणावादरम्यान सोमवारी खनिज तेलाच्या किमती ५०४ रुपयांनी वाढून ६,५९६ रुपये प्रति बॅरल या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) , एप्रिल डिलिव्हरीसाठी खनिज तेलाचा भाव ५०४ रुपयांनी किंवा ८.२७ टक्क्यांनी वाढून ६,५९६ रुपये प्रति बॅरलवर पोहोचला. इराण आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढलेल्यया तणावाचा फटका तेलाच्या वाहतुकीला बसणार आहे. सध्या भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांकडे किमान १० दिवस पुरेल …

Read More »