07/11/26
Breaking News

Shabdraj

एन.टी.सी भागातील भगवान महावीर गार्डन येथील डीपीला मध्यरात्री आग

हिंगोली,दि 20 (प्रतिनिधी) हिंगोली शहररतील एन.टी.सी भागातील भगवान महावीर गार्डन येथे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. दिवस असो वा रात्र, तासनतास वीज गुल होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे महावितरण कंपनीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांमधून केला जात आहे. दिनांक 19 मे च्या मध्यरात्री महावीर गार्डन येथील …

Read More »

हिंगोलीत औषध विक्रेत्यांचा बंद; १२६० औषधी दुकाने बंद

हिंगोली | प्रतिनिधी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत हिंगोली जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी मंगळवारी एकदिवसीय बंद पाळला. जिल्ह्यातील तब्बल १२६० मेडिकल व औषध विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. हिंगोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ऑनलाईन औषध विक्री, ई-फार्मसी तसेच औषध …

Read More »

पूर्णेत श्रीगुरु बुद्धिस्वामी मठ येथील सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

पुर्णा.. प्रतिनिधी(सुशिल दळवी) आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या निधीतून सुमारे 50लक्ष रुपयांच्या सभागृहाचे भूमिपूजन रेखा ताई गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये नगराध्यक्ष विमलबाई कदम, आ. गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुका प्रभारी बंटी कदम, राजू अण्णा एकलारे उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे सर्व नगरसेवक , किशोर सूर्यवंशी, मिलिंद कांबळे, विश्वनाथ होळकर,,नागेश एगडे, ऍड.राज भालेराव, राहुल बरदाले, गंगाधर महाजन, यांच्यासह समाजबांधव …

Read More »

परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार- आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार

सोनपेठ, दि 17 देशात वाढती महागाईने कहर केला असून शेती मालाला भाव नाहीत, शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक हे विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या जुलमी राजवटीला कंटाळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस परभणीचे निष्ठावंत आमदार डॉ राहुल पाटील यांनी व्यक्त केला. तसेच परभणी जिल्हा भगवामय करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. परभणी जिल्ह्यातील …

Read More »

अंत्योदय आणि एकात्म मानववादाचा विचार घराघरात पोहोचवा-माजी मंत्री डॉ.भागवत कराड

बाळु जाधव हिंगोली,दि 17 ः भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्तेसाठी चालणारा पक्ष नसून तो एका विशिष्ट विचारधारेवर आधारलेला पक्ष आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदय आणि एकात्म मानववाद हाच आमच्या कार्याचा मुख्य गाभा आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांने ही विचारधारा आणि केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवाव्यात असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. हिंगोली येथे आयोजित …

Read More »

हिंगोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार; आमदार राजू नवघरे यांचा निर्धार

हिंगोली,दि 17 ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हिंगोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणायचीच, असा ठाम निर्धार आमदार राजू नवघरे यांनी व्यक्त केला आहे. हिंगोली येथील हॉटेल शिवलीला पॅलेसच्या सभागृहात रविवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारानिमित्त या भव्य मेळाव्याचे …

Read More »

हिंगोलीत भाजपच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन

हिंगोली (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६’ अंतर्गत हिंगोली जिल्हास्तरीय दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी शहरातील हॉटेल शांती येथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. ‘समर्थ कार्यकर्ता, सशक्त संघटना’ ही संकल्पना घेऊन आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावी प्रसार करणे या दोन दिवसांत …

Read More »

चिराग शहा तलावामुळे हिंगोलीचा पाणीप्रश्न सुटणार : युवा नेते शिवाजीराव मुटकुळे

हिंगोली,दि 16 ः हिंगोली शहरातील महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या चिराग शहा तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांची युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हिंगोली जिल्हा वार्षिक निधीतून सुमारे 14 कोटी रुपयांच्या खर्चातून सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना शिवाजीराव मुटकुळे म्हणाले की, “चिराग शहा तलाव हा हिंगोली शहराचा आत्मा आहे. आमच्या पिढीने दुष्काळ पाहिला, मात्र …

Read More »

वसमत शहरात खंजर बाळगणाऱ्या दोघांना  अटक

हिंगोली,दि 15 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  वसमत शहरात खंजर शस्त्र जप्त केले आहे.याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक गस्त घालत असताना  शैलेश रोहिदास राऊत रा.कारखाना रोड वसमत,कोंडीबा बालाजी क्षीरसागर रा. कारखाना रोड वसमत यांना वसमत शहरातील हिरो शोरूम जवळ ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्यांचे जवळ एक धारदार घातक हत्यार …

Read More »

खेर्डा शिवारातून बैलजोडी लंपास

रमेश बिजुले पाथरी,दि 15 ः पाथरी तालुक्यातील खेर्डा शिवारात शेतातील आखाड्यावर बांधून ठेवलेली बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना गुरुवार १४ मे रोजी पहाटे घडली आहे. खेर्डा येथील शेतकरी दत्ता किशनराव मस्के यांनी पाथरी पोलीसांना दिलेल्या अर्जानुसार, त्यांच्या मालकीची सुमारे सहा वर्ष वयाची लाल व जाबळ्या रंगाची बैलजोडी शेतातील कामासाठी वापरली जात होती. सदरील शेतकरी बुधवार १३ मे रोजी …

Read More »