हिंगोली,दि 15 ः समाजात हुंडा प्रथेसारख्या अनिष्ट रूढीला छेद देत हिंगोली येथे एका कुटुंबाने साक्षगंध समारंभातच विवाह उरकून नवा आदर्श घालून दिला आहे. राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक आनंद पुंजाराव मस्के यांचे धाकटे चिरंजीव ॲड. अक्षय आनंद मस्के व चि.सौ.का. ऋतुजा कैलासराव काईट, रा. पांढुर्णा यांचा साक्षगंध सोहळा मंगळवार दि. 12 मे 2026 रोजी नवीन पोलीस वसाहतीतील मंगल कार्यालयात …
Read More »Shabdraj
पूर्णेत पालिकेच्या जागेवर शाळेची‘घेराबंदी’, प्रशासनाचे मौन संशयाच्या भोवऱ्यात
पूर्णा प्रतिनिधी : पूर्णा शहरातील सार्वजनिक मालमत्तेच्या कथित बळकावणीचा मुद्दा आता चांगलाच तापू लागला असून, पालिकेच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ. झाकीर हुसैन प्राथमिक उर्दू शाळेकडून कोंडवाडा आणि मुसाफिरखाना या सार्वजनिक जागांवर टप्प्याटप्प्याने कब्जा करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, “पालिका प्रशासन नेमके कुणाच्या दबावाखाली काम …
Read More »जुने डाकघर : एक समस्या… अनेक प्रश्न!प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचा जिवंत नमुना
गंगाखेड प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा गंगाखेड शहरातील डाकघर आजही ब्रिटिशकालीन अवस्थेतच अडकून पडले आहे. पिनकोड ४३१५१४ तेव्हाच मिळाला, पण आजपर्यंत बदल झालाय तो फक्त फोन, लाईट, प्रिंटिंग आणि संगणकापुरताच! धोरणात्मक विकास? तो मात्र कागदावरच. शहर विस्तारले, लोकसंख्या वाढली, योजना वाढल्या; पण डाकघराचा विस्तार शून्य! विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक—बचत योजना, पेन्शन, पत्रव्यवहारासाठी रोजची मोठी गर्दी; तरीही बसण्याची सोय नाही, शौचालय नाही, …
Read More »हिंगोली पालिकेने दिलेला शब्द पाळला; नमो उद्यानाचे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन
हिंगोली,दि 15 ः नगरपालिकेच्या निवडणूक काळात दत्त गल्ली आणि मंगळवारा बाजार परिसरातील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हिंगोली नगर परिषदेने मोठे पाऊल उचलले आहे. येथील पाण्याच्या टाकीखालील मोकळ्या जागेत उभारण्यात येत असलेल्या ‘नमो उद्याना’चे भूमिपूजन नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नगर उद्यान योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी रुपये खर्चून हे उद्यान साकारले जाणार आहे. मंगळवारा बाजार …
Read More »NTA रद्द करा; पारदर्शक पर्यायी यंत्रणा उभी करा-भाकपचे केंद्र सरकारला निवेदन
गंगाखेड | प्रतिनिधी भारतीय कम्युनिस्ट पक्षच्या वतीने कॉमरेड योगेश फड यांनी केंद्र सरकारकडे निवेदन सादर करत NEET व इतर राष्ट्रीय परीक्षा घेणारी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) तात्काळ रद्द करावी, तसेच पारदर्शक व विश्वासार्ह पर्यायी यंत्रणा निर्माण करावी, अशी ठाम मागणी केली आहे. हे निवेदन मा. केंद्रीय शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांना, तहसीलदार, तहसील कार्यालय गंगाखेड, जि. …
Read More »लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या पायाभूत विकासकामांवर भर
हिंगोली : मौजे दुधाळा येथे प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘लिगो इंडिया’ प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध विकासकामांबाबत आज दूरदृष्यप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये विविध पायाभूत विकासकामांवर भर देण्यात आला असून, प्रकल्प पूर्ण करताना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे या उच्चस्तरीय बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीला अणुऊर्जा संशोधन आणि विकास विभागाचे संचालक नितीन जावळे, अणुऊर्जा वित्त विभागाचे सहसचिव मुथु …
Read More »राज्य क्रीडा स्पर्धेत खेळून एसएससी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
सेलू : (प्रतिनिधी) राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत कु. मुक्ता यादवराव घोडके हिने ९३.८० टक्के, कु. सृष्टी कैलासराव सोळंके हिने ९३.२० टक्के, तर ज्ञानराज जयंत बावणे याने ८९.४० टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. नूतन विद्यालयातील तब्बल २१ खेळाडूंनी राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी होत …
Read More »बळसोंड येथे जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
हिंगोली | प्रतिनिधी हिंगोलीजवळील बळसोंड ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. या योजनेचे उद्घाटन गावाचे सरपंच शैलेश जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. यासाठी सरपंच शैलेश जैस्वाल यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनस्तरावर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर …
Read More »ठेका वाळू उपसायचा दिला की गोदावरीचं कंबरडं मोडायचं?
गंगाखेड / प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू उपसण्याचा ठेका दिला म्हणजे काय—नदीची खुलेआम कत्तल करण्याचा परवाना दिलाय का? असा संतप्त सवाल आज गंगाखेड शहरातला सामान्य माणूस रस्त्यावर उभा राहून विचारतोय. ४, ६, ९ ब्रास भरलेले हायवा हजारो लिटर पाणी रस्त्यावर सांडत, धुराळा उडवत, सुसाट वेगानं धावतात… आणि प्रशासन गप्प! ठेका दिला म्हणजे नियम संपले का? किती लोड, …
Read More »जल जीवन व स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
परभणी, दि.७- जल जीवन मिशन (JJM) आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (SBM-G) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सध्या गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पगाराविना विकास कसा साध्य होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जल जीवन मिशन मधील कर्मचाऱ्यांचे सुमारे ५ ते ६ महिने, तर स्वच्छ भारत मिशन मधील कर्मचाऱ्यांचे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com