09/08/26
Breaking News

इत्तर

1 मार्चपासून सिम कार्ड असेल तरच व्हॉट्सॲप चालणार

  केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की ‘सिम बाइंडिंग’चे नियम लागू करण्याची २८ फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. नवीन नियमांनुसार फोनमध्ये सिम कार्ड नसल्यास व्हॉट्सॲपसारखे मेसेजिंग ॲप काम करणार नाहीत. कॉम्प्युटरवर लॉगिन केलेले व्हॉट्सॲप देखील ६ तासांत लॉग-आउट होईल. समजून घ्या, काय आहे नवीन नियम आणि तुमच्यावर कसा होईल परिणाम? १. सिम बाइंडिंगचा नवीन नियम कधीपासून लागू होईल? जेव्हा …

Read More »

जिल्हयाचे पालक सचिव म्हणजे काय? पालक सचिवांची भूमिका काय असते?

परभणीचे पालक सचिव म्हणून तुकाराम मुंढे नियुक्त जिल्ह्याचे पालक सचिव म्हणजे राज्य सरकारकडून एखाद्या विशिष्ट जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले वरिष्ठ आयएएस दर्जाचे अधिकारी. हे अधिकारी त्या जिल्ह्यातील प्रशासनावर थेट काम करत नसले तरी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.   पालक सचिवांची भूमिका काय असते? शासन निर्णयांची अंमलबजावणी तपासणे – राज्य सरकारने घेतलेले निर्णय व योजना जिल्ह्यात …

Read More »

आता ईमेल पत्ता बदलता येणार..नविन फीचर होणार लॉन्च

जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल प्लॅटफॉर्म जीमेल (Gmail) च्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. गूगल लवकरच एक असे फीचर लॉन्च करणार आहे, ज्याची गेल्या दोन दशकांपासून वाट पाहिली जात होती. आता वापरकर्ते त्यांचे जुने किंवा ‘अजीब’ वाटणारे ईमेल ॲड्रेस (@gmail.com) बदलू शकतील. विशेष बाब म्हणजे यासाठी त्यांना नवीन खाते तयार करण्याची गरज भासणार नाही आणि त्यांचा जुना डेटा देखील …

Read More »

8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट..पगार कधी अन् किती

नवी दिल्ली : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. बराच काळ पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू होती. आता आयोगाचे अधिकृत नियुक्ती झाल्याने येत्या काही वर्षांत सरकारी वेतन रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. मात्र नेमकी वाढ किती होणार आणि ती कधी लागू होणार, हे अद्याप ठरलेले नाही. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचा थेट फायदा 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 69 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. म्हणजेच देशातील मोठ्या लोकसंख्येच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम होईल. सध्या लागू असलेल्या 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अपेक्षा आहे की नवीन वेतनरचना वेळेत लागू केली जाईल. सरकारी संकेतांनुसार, सुधारित वेतन आणि पेन्शन 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जाऊ शकते. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती दिली की 8व्या वेतन आयोगाचे गठन 3 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजन प्रभा देसाई आहेत. प्रो. पुलक घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून, तर पंकज जैन यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाला आपला अहवाल तयार करण्यासाठी सुमारे 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, त्यामुळे त्याचा अहवाल 2027 च्या आसपास सादर होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईल, हे मुख्यतः फिटमेंट फॅक्टरवर ठरणार आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगार आणि पेन्शनवर लावला जाणारा गुणक. जर फिटमेंट फॅक्टर 2.15 च्या आसपास ठेवण्यात आला, तर अनेक कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार दुप्पट किंवा त्याहून अधिक होऊ शकतो. याचा परिणाम केवळ पगारावरच नाही, तर HRA, पेन्शन आणि इतर भत्त्यांवरही होणार आहे. गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर आणि कर्मचारी संघटनांमध्ये महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) बेसिकमध्ये विलीन केला जाईल, अशी चर्चा जोरात होती. मात्र, वित्त मंत्रालयाने यावर स्पष्ट भूमिका घेतली असून सध्या असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले आहे. DA आणि DR पूर्वीप्रमाणेच दर सहा महिन्यांनी AICPI-IW निर्देशांकाच्या आधारे वाढवले जात राहतील. त्यामुळे या विषयावर पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.  

Read More »

पालक-चिकन खाण्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

आवडीचे चमचमीत पदार्थ ताटात दिसले की आपण त्याच्यावर तुटून पडतो. मात्र ते अतिप्रमाणत खाल्लं की वेगवेगळ्या परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागत. अशीच एक घटना ओडिशात घडली आहे. पालक चिकन खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. विषबाधेमुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील इटप गावात एका कुटुंबाने पालक चिकन खाल्लं. त्यानंतर त्यांना त्रास …

Read More »

मोठी बातमी : क्रिकेटच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड तुटले

बिहार संघाने क्रिकेट इतिहासात नवा सुवर्णअध्याय लिहिला आहे. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात बिहारने 50 षटकांत 6 गडी गमावत तब्बल 574 धावा ठोकल्या. या डावात 3 फलंदाजांनी शतके ठोकली. हा लिस्ट-ए क्रिकेटमधील आजवरचा सर्वोच्च संघ स्कोअर ठरला आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध बिहारच्या फलंदाजांनी खळबळ उडवून दिली. वैभवची वादळी खेळी, तीन वर्षांनंतर तुटलेला विक्रम सलामीवीर वैभव …

Read More »

डिसेंबरमध्ये राहणार बँका एवढ्या .. दिवस बंद राहणार

2025 मधील शेवटचा महिना असलेल्या डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहणार आहेत. विविध राज्यातील सण आणि उत्सवांच्या निमित्तानं बँका त्या ठिकाणी बंद असतील. तर, साप्ताहिक सुट्टीमुळं बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. डिसेंबरमध्ये ख्रिसमस शिवाय इतर राज्यातील स्थानिक सणांमुळं बँका बंद राहतील. डिसेंबर महिन्यात बँकेतील काही कामांचं नियोजन करत असाल तर तुम्हाला बँकांना सुट्टी कधी आहे. हे माहिती असणं आवश्यक आहे. डिसेंबरमध्ये बँकेत चेक जमा करणे, डीडी तयार करणे किंवा कर्जासंदर्भातील काही कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर …

Read More »

भारत-अमेरिका करार… गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही?

भारतातील (India) तब्बल 62 टक्के घरांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजीचा (LPG) वापर केला जातो. मात्र देशातील जवळपास 90 टक्के एलपीजी परदेशातून आयात केले जाते आणि त्यातील मोठा हिस्सा मध्य-पूर्व देशांकडून मिळतो. याच पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेसोबत (America) एलपीजी आयातीसाठी मोठा करार केला असून 2026 मध्ये अमेरिकेतून अंदाजे 2.2 दशलक्ष टन एलपीजी आयात करण्यात येणार आहे. हा देशाच्या एकूण वार्षिक आयातीपैकी सुमारे 10 टक्के …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? नगरपंचायत आणि नगरपरिषद यात फरक काय?

भारतीय लोकशाहीचा पाया हा “जनतेचे शासन, जनतेद्वारे आणि जनतेसाठी” या तत्त्वावर उभा आहे. या तत्त्वाचा मूळ गाभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. कारण केंद्र आणि राज्य सरकार जितके व्यापक क्षेत्र पाहतात, तितक्याच सूक्ष्म पातळीवर सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याचे आणि विकास घडविण्याचे काम या संस्थांकडून केले जाते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचे खरे आधारस्तंभ मानल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेची संकल्पना (Concept …

Read More »

घरगुती फेसपॅक जे खुलवतील तुमच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य

आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि वातावरणात त्वचेची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. स्किन केअर करताना नैसर्गिक घटकांचा वापर करणे नेहमीच फायदेशीर ठरते, कारण तज्ज्ञांच्या मते अशा गोष्टींना दुष्परिणाम नसतात. कोरफड, हळद, मध, नारळाचे तेल, गुलाबपाणी यांसारखे नैसर्गिक उपाय त्वचेला आतून पोषण देतात. प्रत्येक घटकाचे वेगळे गुणधर्म असतात आणि ते त्वचेवर लावल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या निरोगी आणि तेजस्वी …

Read More »